Non-Basmati Rice Agrowon
ॲग्रो विशेष

Non-Basmati White Rice And Parboiled Rice : केंद्र सरकारने उकडा तांदूळ आणि बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचे निर्यात शुल्क हटवले, डिजीएफटीने जारी केले नोटिफिकेशन

CG Reduced Export Duty On Rice : "बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील किमान निर्यात मुल्य (MEP) तात्काळ प्रभावाने केंद्र सरकारने हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचना काढली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारने पॅराबोइल्ड तांदूळ म्हणजेच उकडा तांदळ्याच्या निर्यातीवरील १० टक्के शुल्क शुन्य केले. तसेच बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर ४९० डॉलर प्रति टन निर्यात शुल्क देखील हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) बुधवारी (ता. २३) अधिसूचना जारी केली. याआधी सरकारने २८ सप्टेंबर रोजी गैर-बासमती पांढऱ्या तांदळावरील निर्यात बंदी उठवली होती आणि तांदळाच्या निर्यातीवर ४९० डॉलर प्रति टन किमान निर्यात मुल्य लागू केले होते.

केंद्र सरकारने २० जुलै २०२३ रोजी देशात तांदळाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी बिगर बासमती पांढऱ्या तांदूळ आणि उकडा तांदळच्या निर्यातीवर घातली होती. जी गेल्या महिन्यात २८ सप्टेंबर रोजी उठवली. पण उकडा तांदूळ आणि बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यात शुल्क लावले होते. उकडा तांदळच्या निर्यातीवर निर्यात शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले होते. तर बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर ४९० डॉलर प्रति टन निर्यात शुल्क लावण्यात आले होते. पण आता उकडा तांदूळ आणि बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्याबाबत निर्णय घेताना किमान निर्यात मुल्य तात्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आल्याचे, महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचनेत म्हटले आहे.

दरम्यान भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाच्या (आयआरइएफ) म्हणण्यानुसार, ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत सध्या देशात २३५ लाख टन तांदळाचा मोठा साठा आहे. याशिवाय या हंगामात २७५ लाख टन अतिरिक्त तांदूळ बाजारात येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे देशात तांदळाचा मोठा साठा जमा होईल. अशा परिस्थितीत तांदूळ उत्पादक शेतकरी आणि भात व्यापारी यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तांदूळ निर्यातीसाठी निर्बंधमुक्त काम करण्याची संधी मिळाली तरच दिलासा मिळू शकेल. सध्या तांदळाचे उत्पादन आणि साठवणुकीची समस्या यामुळे चालू खरीप हंगामात बफर स्टॉकसाठी तांदूळ खरेदी करणे सरकारला कठीण झाले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर तांदळाची निर्यात वाढू शकते.

याबाबत आयआरइएफने केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना अतिरिक्त साठा आणि जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्यांकडून निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती दिली. तसेच उकडा तांदूळ आणि बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचे किमान निर्यात शुल्क काढून टाकण्याची विनंती केली होती.

भारताने चालू आर्थिक वर्षात एप्रिल-ऑगस्ट दरम्यान २० कोटी १ लाख डॉलर किमतीचा गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात केला आहे. तर २०२३-२४ मध्ये ही निर्यात ८५ कोटी २५.२ लाख डॉलरची होती. निर्यातीवर बंदी असली तरी, सरकार मालदीव, मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि आफ्रिका यांसारख्या मित्र राष्ट्रांना बिगर बासमती पांढरा तांदळाची निर्यात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Theft : पोलिस पाटलांच्याच बागेतून डाळिंबांची चोरी

Diwali Bonus : महात्मा फुले दूध डेअरीतर्फे दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये बोनस

Soybean Procurement Center : सव्वा लाख हेक्टरवर सोयाबीन, तर खरेदी केंद्रे दोनच

Water Supply : ‘कोकाकोला’चे पाणी बंद करा

Golden Sitafal : गोल्डन सीताफळाकडे ग्राहकांची पाठ

SCROLL FOR NEXT