Solar Pumps Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pumps : केंद्र सरकार तेलंगणातील शेतकऱ्यांना १ लाख सोलर पंप देण्याची शक्यता

Telangana Farmers : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी १ लाख सोलर पंप देण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पीएम आवास योजनेतून अधिकच्या २० लाख घरांना मंजूरी देण्याची शक्यता आहे.

Dhananjay Sanap

Agriculture Support : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी १ लाख सोलर पंप देण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पीएम आवास योजनेतून अधिकच्या २० लाख घरांना मंजूरी देण्याची शक्यता आहे. आदिवासी शेतकऱ्यांना सोलर पंप आणि अतिरिक्त घरांची मागणी करणारं पत्र तेलंगणा सरकारने केंद्र सरकारला लिहिलं आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी चर्चा केली आहे.

रेड्डी यांनी तेलंगणातील सिंचनाची सुविधा पूर्ण करण्यासाठी पीएम किसान योजनेतून एक लाख सौर पंप मंजूर करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. तेलंगणामध्ये मोठया प्रमाणात शेतकरी या योजनेतून कृषी पंपासाठी अर्ज करत आहेत. तसेच या योजनेतून शेतकऱ्यांना अधिक उत्तम सिंचन सुविधा मिळू शकते, असंही रेड्डी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितलं आहे.

मुख्यमंत्री रेड्डी यांनी सांगितलं की, मेट्रोच्या पहिल्या पाच कॉरिडॉरसाठी ७६.४ किमीच्या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिलेला आहे. त्याला मंजूरी देण्याची आणि केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत २४,२६९ कोटी रुपये निधी वाटप करण्याची विनंती मंत्री खट्टर यांना केली आहे. तर मुसी नदी पुनरुद्धारचं महत्त्व समजावून सांगत रेवंत रेड्डी यांनी खट्टर यांच्याकडून नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर ५५ किलोमीटरच्या परिसरात कालवे, बॉक्स ड्रेन्स आणि एसटीपी बांधण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची केंद्रीय मदत करण्याची विनंती केली आहे.

तेलंगणा मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत २० लाख घरांना मंजूर देण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारला स्वस्तातील घर निर्माण करण्यासाठी लागणारा आराखडा केंद्र सरकारला पाठवला आहे. तर मेट्रो रेल्वे कॅरीडॉरसह इतर योजनेनासाठी निधी देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय घरकुल आणि शहर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी १.७८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवल्याबद्दल कौतुक केलं. रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांना ५ ट्रीलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं लक्ष्य पूर्ण करून तेलंगणालाही १ ट्रीलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पाऊल टाकण्यात आल्याचं सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT