Onion Export Ban Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा फेरविचार करण्याची मागणी

Farmer Protest : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि जनजाती राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेत, निर्यातबंदीबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली. याबाबतचे पत्रही त्यांना दिले असल्याची माहीती मंत्री डॉ. पवार यांनी दिली.

केंद्रीय जनजाती राज्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. भारती पवार यांचे शनिवारी (ता. ९) नाशिक येथील निवासस्थानी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. त्या वेळी डॉ. पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आधी ४० टक्के निर्यातशुल्क नंतर ८०० डॉलर किमान निर्यातमूल्य वाढवल्यामुळे मागील चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असतानाच आता केंद्र सरकारने कांद्यावर शुक्रवारी संपूर्ण निर्यातबंदी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली दौऱ्यात असताना डॉ. पवार यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती.

कांदा प्रश्नावर राजकारण नको

माझ्या पूर्ण भावना शेतकऱ्यांसोबत आहेत. याबाबतीत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. देशात कुठे ना कुठे निवडणुका सुरूच असतात, निवडणुकीचा आणि या निर्यातबंदीचा काहीच संबंध नाही, असे म्हणत मंत्री डॉ. भारती पवार यांनी, निवडणुका आल्यावर कांद्याचा प्रश्न उभा राहतो हा आरोप फेटाळून लावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कांदा प्रश्नावर चांदवड येथे आंदोलन करणार आहेत, याबाबत विचारणा केली असता डॉ. पवार यांनी याबाबतीत राजकारण न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धोरण सर्वांनी अवलंबले पाहीजे, असे सांगितले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, मनोज बेलदार, प्रवीण रौंदळ, सुनील बच्छाव, नितीन गायकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हजर होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT