Oil Consumption In India : केंद्र सरकारने स्वयंपाक घरातील खाद्यतेलाच्या वापराचं सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी तेलबिया पिकांच्या अनुषंगाने धोरण तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून ग्राहकांच्या मागणीनुसार शेतकरी तेलबिया पिकांची लागवड करतील. या सर्वेक्षणासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून पुढाकार घेतला जात आहे.
'My Gov' या पोर्टलच्या मदतीने ९ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. २३ फेब्रुवारी रोजीपर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात खाद्यतेलाच्या वापराबद्दल आणि घरातील वापर प्राधान्याबद्दल प्रश्न विचारले असून त्यातून माहिती संकलित केली जाणार आहे, असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. देशात एकूण वापराच्या सुमारे ६२ टक्के खाद्यतेल आयात केलं जातं.
२०२२-२३ च्या आकडेवारीनुसार देशातील तेलबिया पिकांचं उत्पादन ३९० लाख टन होतं. त्यामुळे केंद्र सरकारने खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्यासाठी राष्ट्रीय तेलबिया मिशन ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी १० हजार १०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील सहा वर्षात तेलबिया पिकांचं उत्पादन ६९७ लाख टनांवर पोहचवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणातून उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रीय खाद्यतेल धोरणात योग्य ते बदल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खाद्यतेल आयात मंदावली
सॉल्वेंट एक्सट्रैक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ च्या (नोव्हेंबर-ऑक्टोबर) विपणन वर्षातील खाद्यतेलाची आयात मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्के घटली असून १५.९६ दशलक्ष टन झाली आहे. त्यासाठी १ लाख ३१ हजार ९६७ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. यामध्ये औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या बिगर खाद्यतेलाचा समावेश नाही. दरम्यान चालू वर्षात खाद्यतेल आयात १ दशलक्ष टनाने कमी होण्याची शक्यता सॉल्वेंट एक्सट्रैक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तवली आहे.
सर्वेक्षणात कोणते प्रश्न?
या सर्वेक्षणात घरातील अन्न शिजवताना दर महिना किती लिटर खाद्यतेलाचा वापर केला जातो, कोणत्या प्रकारचे खाद्यतेल वापरले जाते, तेलात तळलेली पदार्थ महिन्यातून किती वेळा तयार केले जातात. तसेच विविध प्रकारातील खाद्यतेलातील बदल, त्रुतूनुसार खाद्यतेल वापरात होणारे बदल, विविध खाद्यतेलांचा होणार वापर आदि प्रश्नांचा समावेश आहे. तसेच ग्राहक कोणत्या खाद्यतेलाच्या ब्रॅंडचा वापर करतात, त्याची किंमत किती, आरोग्यानुसार खाद्यतेलाचा वापर आणि कोणत्या खाद्यतेलाला नकार दिला जातो, अशी प्रश्न विचारण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.