Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton MSP : ‘सीसीआय’ने कापसाचा हमीदर शंभर रुपयांनी घटविला

CCI Decision : कापसाचा दुसरा वेचा होत असून त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असले तरी रुईचा उतारा कमी मिळत असल्याच्या कारणांखाली भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापसाचा हमीदर शंभर रुपयांनी घटविला आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : कापसाचा दुसरा वेचा होत असून त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असले तरी रुईचा उतारा कमी मिळत असल्याच्या कारणांखाली भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापसाचा हमीदर शंभर रुपयांनी घटविला आहेत. ‘सीसीआय’च्या केंद्रांवर सध्या लांब धाग्याच्या कापसाला सात हजार ४२१ रुपये दर मिळत आहे.

कापूस पणन महासंघ मोडीत निघाल्यानंतर आता ‘सीसीआय’मार्फत कापसाची खरेदी करण्यात येत आहे. हमीदराने कापसाची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी प्रारंभी खासगी बाजाराऐवजी सीसीआयला प्राधान्य दिले. पहिल्या वेचातील कापसाला सीसीआयने हमीदर दिले. आता मात्र हे दर शंभर रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. सध्या दुसऱ्या वेचातील (झडतीचा) कापूस बाजारात येत आहे. या कापसातील रुईचे प्रमाण पहिल्या वेचातील प्रमाणापेक्षा कमी असल्याचे कारण देण्यात आले आहे.

एक क्विंटल कापसातून सरासरी ३८ किलो रूई मिळत असल्याने व रुईचे दर बाजारात अधिक असल्याने ‘सीसीआय’ने पहिल्या वेचातील लांब धाग्याच्या कापसाला सात हजार ५१२ रुपये तर मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार १२१ रुपये हा हमीदर दिला. दुसऱ्या वेचातील एक क्विंटल कापसातून ३४ ते ३५ किलो रुई निघत असल्याने प्रत कमी करीत हमीदर शंभर रुपयांनी कमी केले आहेत.

त्यामुळे ‘सीसीआय’च्या केंद्रावर सध्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सात हजार ४२१ रुपये दर मिळू लागला आहे. ‘सीसीआय’ने हमीदर कमी करताच शेतकऱ्यांचा मोर्चा खासगी बाजाराकडे वळू लागला आहे. खासगी बाजारात हमीदराने खरेदी होऊ लागली आहे. हमीदर सात हजार ५२१ रुपये आहेत.

चार केंद्रांवर पाच हजार क्विंटल आवक

अमरावती बाजार समितीअंतर्गत ‘सीसीआय’च्या चार केंद्रांवर ८० हजार क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे, तर खासगी बाजारात पंधरा हजारांच्या जवळपास खरेदी झाली आहे. मंगळवारी (ता. ७) चार केंद्रांवर एकूण चार हजार ९६५ क्विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली. तर बाजार समितीअंतर्गत ९५ क्विंटल कापसाची आवक झाली आहे. या कापसाला किमान सात हजार २५० ते ७५५० रुपये दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT