Cotton Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : केंद्रे तयार, खरेदीचा पत्ता नाही

भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) शेतकऱ्यांकडून हमीभावातच कापूस खरेदी करते. सध्या कापसाचे दर हमीभावापेक्षा जास्त आहे.

Team Agrowon

Yavtmal News : कापूस पणन महासंघाला (Cotton Marketing Federation) राज्य सरकारने कापूस खरेदीस (Cotton Procurement) स्पष्ट नकार दिला आहे. त्याच वेळी सीसीआय (भारतीय कापूस निगम लिमिटेड) (Cotton Corporation Of Indian) ने खुल्या बाजारातून कापूस खरेदीची घोषणा केली होती.

त्याकरिता केंद्रे तयार ठेवलेली असली तरी खासगीत दर चांगले असल्याने ती अ‍ॅक्टिव्ह केलेली नाहीत.

यावर्षी ‘सीसीआय’ने खुल्या बाजारातून कापूस (Cotton) खरेदीच्या हालचाल्या सुरू केल्या आहेत. ‘सीसीआय’ने जिल्ह्यात सर्वाधिक सात केंद्रे निश्‍चित केलेली आहेत. मात्र, अजूनही ती अ‍ॅक्टिव्ह केलेली नाहीत.

भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) शेतकऱ्यांकडून हमीभावातच कापूस खरेदी करते. सध्या कापसाचे दर हमीभावापेक्षा जास्त आहे.

परिणामी, ‘सीसीआय’ने कापूस खरेदी सुरू केलेली नाही. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे. सध्या बाजारात कापसाला आठ हजार दोनशे रुपये दर मिळत आहे. ‘सीसीआय’ हमीभावापेक्षा जास्त दर देऊ शकत नाहीत.

‘सीसीआय’ने केंद्रे सुरू केलेली असली तरी शेतकऱ्यांचे हित पाहता खरेदी सुरू केलेली नाहीत. ‘सीसीआय’चे सहायक महाप्रबंधकांनी कापूस खरेदीबाबतची भूमिका प्रशासनाला कळविली आहे. कापसाला ‘एमएसपी’पेक्षा जास्त दर मिळत आहेत.

त्यात ‘सीसीआय’ला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. कापसाचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्यास सीसीआय बाजारात उतरेल, असे पत्रात नमूद आहे.

‘पणन’ला मान्यताच नाही

‘सीसीआय’चा सब एजंट म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करतो. यंदा ‘सीसीआय’ने ‘पणन’ला सब एजंट म्हणून मान्यता दिलेली नाही. पणन महासंघाकडून जिल्ह्यात जवळपास सात केंद्रांवर कापूस खरेदी करते.

गेल्या दोन वर्षांपासून ‘पणन’ची केंद्रे बंद आहेत. त्याचवेळी पणन महासंघाने राज्य शासनाकडून कापूस खरेदीसाठी बँक गॅरंटीची मागणी केली होती. राज्य शासनाने हा प्रस्ताव फेटाळल्याने आता पणनच्या कापूस खरेदीच्या अशा मावळल्या आहेत.

‘एमएसपी’पेक्षा ३० टक्के अधिक दर

कापसाला सध्या बाजारात हमीभावापेक्षा ३० टक्के अधिक दर मिळत आहे. हे दर शेतकऱ्यां‍साठी हमीभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळेच ‘सीसीआय’ची केंद्रे तयार असले तरी त्यांनी कापूस खरेदीला सुरुवात केलेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT