Cashew Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Crop : काजूपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव

Cashew Disease : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तत्पूर्वी डिसेंबर अखेरीस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा मोठा परिणाम काजू पिकांवर झाला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काजू पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला असुन कोवळी काजू बी खाणाऱ्या किडीच्या उपद्रवाने काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात इतर भागात देखील काजू बी काळवंडण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तत्पूर्वी डिसेंबर अखेरीस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा मोठा परिणाम काजू पिकांवर झाला आहे. यापूर्वी अनेक भागांत कोवळी काजू बी काळवंडल्याचे चित्र होते.

दरम्यान दोडामार्ग तालुक्यात काजू पिकावर कीड-रोगांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोठ्या प्रमाणात कोवळी काजू बी काळवंडत आहेत. त्यातच आता कोवळी काजू बी खाणाऱ्या किडीचा उपद्रव सुरू झाला आहे. ही कीड कोवळी बी पोखरत आहे. त्यामुळे काजूचे मोठे नुकसान होत आहे. या किडीच्या उपद्रवाने काजू उत्पादक हैराण झाले आहेत.

या किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दोडामार्ग तालुक्यात जाणवत आहे. याशिवाय उर्वरित भागात देखील काही प्रमाणात सुरू आहे. कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या तीन-चार फवारण्या घेतल्यानंतर कीड-रोग नियत्रंणात येत नसल्यामुळे काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.

माझी कुडासे (ता. दोडामार्ग) येथे साडेपाच एकरात काजू बाग आहे. या काजुवर आतापर्यंत मी कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या चार फवारण्या घेतल्या आहेत. परंतु तरीदेखील कोवळी काजू बी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. या संदर्भात विद्यापीठाने तातडीने उपाययोजना सूचवाव्यात.
- आकाश नरसुले, काजू उत्पादक, कुडासे, ता. दोडामार्ग
काजू बोंडू व काजूगर पोखरणारी अळी ही काजू बी आणि बोंडू ही ज्या ठिकाणी जोडली जाते तिथून प्रवेश करते. बी कोवळी असतानाच हा प्रादुर्भाव अधिक होतो. ही अळी बोंडू आणि कोवळ्या बी तील गर खाते. या अळीच्या नियत्रंणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.
- प्रा. विवेक कदम, काजू अभ्यासक, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी, ता. वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT