Nashik APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik APMC Recruitment : नाशिक बाजार समितीची नोकरभरती रद्द करा ः चुंभळे

Nashik APMC News : नाशिक बाजार समितीची नोकरभरती बाजार समिती कायद्यातील तरतुदी, शासनाकडील परिपत्रकीय आदेश आदींचा भंग करणारी आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक बाजार समितीची नोकरभरती बाजार समिती कायद्यातील तरतुदी, शासनाकडील परिपत्रकीय आदेश आदींचा भंग करणारी आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे सुरू असलेली बाजार समितीची नोकरभरती तत्काळ रद्द करावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक शिवाजी चुंभळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

याबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधक तसेच सहकार आयुक्तांना दिले असल्याचेही चुंभळे यांनी सांगितले. एकाच भरतीसाठी दोनदा जाहिरात प्रसिद्ध करून विद्यमान सभापतींनी बाजार समितीचा निधी व वेळ खर्च केले आहे.

ज्या बाजार समितीमधील विद्यमान कर्मचाऱ्यांना शासकीय लागू असलेले वेतन देता येत नाही, अशा बाजार समितीने अधिक कर्मचाऱ्यांकरिता भरतीचा घाट घातला आहे.

मुंबई, नागपूर व पुणे बाजार समितीबरोबरच नाशिक बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्यात येणार असल्याने केंद्राच्या परिपत्रकानंतर लगेचच सदर संचालकांनी त्वरित भरती प्रक्रिया चालू केली. या भरतीमध्ये संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

भरतीपूर्वी न्यायालयीन व शासकीय आदेशांचा भंग करून स्टेनोटायपिस्ट पदावरील कर्मचाऱ्याला थेट सहाय्यक सचिव पदावर व इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली जम्पिंग पदोन्नती, समांतर आरक्षण तरतुदीचे पालन न करणे, सदोष बिंदूनामावली, विद्यमान कर्मचाऱ्यांना जुन्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येणारे वेतन व रोखून धरलेली वार्षिक वेतनवाढ व त्यानुसार सादर केलेली चुकीची आस्थापना खर्चाची टक्केवारी, या सर्व बाबी विचारात घेता सदरील भरती बेकायदेशीर आहे.

शेतकऱ्यांच्या जिवावर चाललेल्या बाजार समितीत केवळ भ्रष्टाचार सुरू आहे. या समितीत सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली गेलेली नाही. बोनसबाबत कुठल्याही प्रकारचा विषय बैठकीमध्ये घेतला गेला नाही. सचिव प्रोसिडिंग दाखवत नाही, सोसायटी सभासद असलेल्या मतदारांच्या विम्याची देखील चौकशी सुरू आहे. उत्पन्न कमी अन् खर्च जास्त असा प्रकार समितीत सुरू आहे.
- शिवाजी चुंभळे, माजी सभापती तथा विद्यमान संचालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT