Goat Kid Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Kid Management : जास्त दूध शेळीच्या करडांसाठी ठरु शकते घातक?

Goat Kid Disease : फ्लॉपी कीड सिंड्रोम हा करडातील वयाच्या ३ ते १४ दिवसांत होणारा पोटाचा आजार आहे. जर करडाला तुम्ही जास्त प्रमाणात दूध देत असाल तर, तुमच्या करडाला हा आजार होऊ शकतो.

Team Agrowon

Goat Management : शेळ्यांच्या करडांची जन्मल्यानंतर मोठ्या प्रमाणात मरतूक होते. त्यामुळे शेळीपालकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत. करडू जन्मल्यानंतर करडांची पहिले तीन दिवस तब्येत चांगली असते. या काळातच त्याच्या शरीराच्या सर्व हालचाली व्यवस्थित असतात. पण नंतर मात्र करडू अचानक सुस्त, निस्तेज आणि अशक्त होत.  वेळेवर जर उपचार केले नाहीत तर करडे २४ ते ३६ तासातच दगावतात. हे कशा मुळे होत असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  

कारणे

फ्लॉपी कीड सिंड्रोम हा करडातील वयाच्या ३ ते १४ दिवसांत होणारा पोटाचा आजार आहे.  जर करडाला तुम्ही जास्त प्रमाणात दूध देत असाल तर, तुमच्या करडाला हा आजार होऊ शकतो. करडाने जास्त दूध पिल्यामुळे पोटामध्ये घातक जिवाणूंची वाढ झपाट्याने होण्यास सुरुवात होते किंवा जिवाणूचे विषारी द्रव्य आतड्यात शोषले जाते. काही वेळा शेळी मरण पावल्यास तिच्या करडाला गाय किंवा दुसऱ्या शेळीचे दूध किंवा मिल्क रिप्लेसर जास्त प्रमाणात दिल जातं. यामुळे ही हा आजार होऊ शकतो. आतड्याची हालचाल कमी किंवा बंद झाल्यामुळे करडाचे पोट साफ होत नाही. पोटात बिघाड झाल्यामुळे करडू बेशुद्ध होऊन २४ ते ३६ तासांत दगावते.

आता पाहुया या आजारीच लक्षणे काय आहेत ते

सुरुवातीला करडू खूप कमी चालते, दुसऱ्या पिलांसोबत खेळत नाही. त्याला पळता येत नाही. मागील पायांत अशक्तपणा आल्यामुळे अडखळत चालते. करडू सुस्त, निस्तेज आणि अशक्त होते. पायाचे स्नायू कमकुवत होतात, स्नायू थरथर कापतात. करडू शेळीला दूध पिण्यासाठी प्रयत्न करते, पण अशक्तपणामुळे दूध पिऊ शकत नाही. पोटाचा आकार वाढल्यासारखा दिसतो. आजारात हगवण अजिबात लागत नाही. संडास घट्ट होते. कान, पाय थंड पडतात. शरीराचे तापमान साधारण असते किंवा थोडे कमी होते. नाडीचे ठोके वाढतात, श्‍वास खोल आणि जलद गतीने होतो. करडात तोंडातून लाळ किंवा पाणी गळताना दिसते. वेळेवर जर उपचार केले नाहीत तर करडे २४ ते ३६ तासातच दगावतात. करडाचे वय ३ ते १४ दिवस असताना लक्षणांवरून निदान सहज करता येते. बाधित करडू दगावल्यास, शवविच्छेदनात त्याच्या पोटात न पचलेले, दह्यासारखे घट्ट दूध दिसून येते, त्यास आंबूस वास येतो.

उपचार  

सगळ्यात पहिल्यांदा पशुवैद्यकाकडून योग्य निदान करून उपचार करावेत. आतड्यातील जिवाणूंची वाढ थांबविण्यासाठी डॉक्टरांकडून प्रतिजैविके आणि सलाइन द्यावीत. उपचार केल्यावर चार ते सहा तासात करडू बरे होते. पण लक्षणे जर जास्त गंभीर असतील तर तीन दिवस उपचार करावे लागतात.

हा आजार होउ नये म्हणून काय कराल ? तर करडाच्या वयाच्या दोन आठवड्यापर्यंत करडाला जास्त दूध एकाच वेळेस पाजू नका. करडाला शेळी, गाईचे दूध किंवा मिल्क रिप्लेसर द्यायचे असल्यास थोडे थंड करूनच द्यावे, जेणेकरून करडू जास्तीचे दूध पिणार नाही. करडू दूध पिण्यासाठी सोडल्यावर त्यावर लक्ष ठेवावे. 

माहिती आणि संशोधन - पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT