Team Agrowon
करडांचा जन्म झाल्यावर मातेचा चीक हाच सर्वोत्तम खुराक आहे. जन्माच्या पहिल्या ४ ते ५ दिवसांत वजनाच्या १० टक्के चीक करडांना देणे गरजेचे असते.
चीक योग्य प्रमाणात दिल्यास करडे-कोकरे सशक्त आणि निरोगी बनतात.
करडांच्या आईस चीक नसेल तर दुसऱ्या शेळीचा चीक उपलब्ध असल्यास पाजावा किंवा पाणी २६४ मि.लि.+ दूध ५७५ मि.लि. + एरंडी तेल २. ५ मि.लि. + १ अंडे + १०,००० आय यु जीवनसत्त्व ""अ'' + ऍरोमायसीन ८० मि. ग्रॅम यांचे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळा विभागून द्यावे.
नवजात करडास पाच दिवसांनंतर करडाच्या वजनाच्या १०० टक्के इतके दूध पाजावे किंवा करडास व्यवस्थित पचन होऊन त्या प्रमाणात दूध पाजावे.
करडे वयाच्या १ ते २ आठवड्यांपासून चारा चघळण्यास सुरवात करतात. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण (लसूणघास, शेवरी, सुबाभूळ) द्यावी.
करडू २५ दिवसांचे असल्यापासून थोडा (५० ग्रॅम) खुराक द्यावा. खुराकातील प्रथिने मिळाल्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होईल.