Agriculture Pump  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pump Theft : पठार भागावर वीजपंपांसह केबल चोरीचे प्रकार थांबेना

Agriculture Pump : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतकऱ्यांसमोर चोरांचे संकट उभे राहिले आहे. सातत्याने शेतकऱ्यांच्या वीजपंप व केबल चोरी जात आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

Team Agrowon

Sangamner News : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतकऱ्यांसमोर चोरांचे संकट उभे राहिले आहे. सातत्याने शेतकऱ्यांच्या वीजपंप व केबल चोरी जात आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दुसरीकडे घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होऊनही चोरट्यांचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागावर काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी बोटा, कुरकुटवाडी, केळेवाडी, माळवाडी, हिवरगाव पठार यागावासह आदी गावांमधील शेतकऱ्यांचे वीजपंप चोरून नेले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी घारगाव पोलिसात गुन्हेही दाखल केले. मात्र अद्याप पोलिसांना चोरट्यांचा शोध लावता आला नाही.

पुन्हा काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी जांबूत, साकूर परिसरातील मुळा नदी पात्रातून वीज पंप व केबल चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. त्याही चोऱ्यांचा शोध लागला नाही. यावरच चोरटे थांबले नाहीत तर पुन्हा चोरट्यांनी शिंदोडी परिसरातील काही शेतकऱ्यांच्या पाणबुडी, वीज पंप व केबल चोरून पोबारा केला. त्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. पोलिस ठाण्यात फक्त गुन्हे दाखल होतात. मात्र चोरट्यांचा शोध काही लागत नाही.

आधीच पठार भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. थोड्याफार प्रमाणात पाणी आहे, तर पिकांना बाजारभाव नाही, अशा कठीण परिस्थितीत शेतकरी शेती करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊनही घारगाव पोलिसांना चोरट्यांचा शोध लावता आला नाही. त्यामुळे आणखी किती शेतकऱ्यांच्या वीजपंप व केबल चोरी गेल्यानंतर घारगाव पोलिस शोध लावणार आहेत, असा सवालही संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.

चोरट्यांनी विहिरीतून वीज पंप व केबलही चोरून नेली. त्यामुळे शेतात असलेला जनावरांचा चारा, गहू यांना पाणी कसे भरायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन ६७ हजार रुपयांची नवीन वीज पंप आणला.
- बाळासाहेब वडितके, शेतकरी, शिंदोंडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT