Gram Panchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : परभणी तालुक्यात तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक

Latest Marathi News : परभणी तालुक्यातील ताडपांगरी, वरपूड व किन्होळा ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एका प्रभागासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी तालुक्यातील ताडपांगरी, वरपूड व किन्होळा ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एका प्रभागासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून या प्रभागांमध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार निवडणुकीची नोटीस शुक्रवारी (ता. ६) प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा कालावधी सोमवार (ता. १६) ते शुक्रवार (ता. २०) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहेत. सोमवारी (ता. २३) सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे.

बुधवारी (ता. २५) निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिम उमेदवारांची यादी दुपारी ३ वाजेनंतर प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास रविवारी (ता. ५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.

सोमवारी (ता. ६) मतमोजणी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निकाल घोषित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना गुरुवारी (ता. ९)पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक प्रभागातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा लोकप्रतिनिधींना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT