Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Chemical Fertilizer : रासायनिक खतांची लिकिंगसह खरेदी बंद

Fertilizer Linking : खतांच्या लिकिंगमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो तसेच विक्रेत्यांना कृषी विभागाचाही त्रास सहन करावा लागत आहे.

Team Agrowon

Nashik News : सध्या कृषी निविष्ठा,रासायनिक खते विक्रेते लिकिंगमुळे आर्थिकदृष्ट्या भरडले जात असल्यामुळे शनिवार (ता. २१) रोजी नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनची (नाडा) या मुद्द्यावर बैठक पार पडली. झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात कुठेही रासायानिक खते लिकिंग मटेरियलसह खरेदी करू नये असा सुर विक्रेत्यांचा होता. त्यानुसार खते लिकिंगसह खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खतांच्या लिकिंगमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो तसेच विक्रेत्यांना कृषी विभागाचाही त्रास सहन करावा लागत आहे. रासायनिक खते विक्रीचा व्यवसाय करताना कुठलाही मानसिक त्रास सहन करावा लागू नये तसेच लिकिंगमुळे होणारे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी रासायनिक खते लिकिंग खरेदी बंद करणे गरजेचे आहे, असा भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी एकजूट दाखवली तर निश्चितच यावर चांगला मार्ग निघेल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीला नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, नाशिक जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष तसेच सभासद व कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

रासायनिक खते उत्पादक कंपन्या दुकानदारांना खते लिंकिंगसह विक्री करतात.मात्र अनेकदा शेतकऱ्यांना खरेदीचा आग्रह करता येत नाही.त्यामुळे खते दुकानातच पडून राहतात.

तसेच काही प्रसंगी शेतकरी व विक्रेते यांच्यामध्ये वादाचे प्रसंगही घडतात तर दुसरीकडे आर्थिक तोटाही होतो.त्यामुळे मनस्ताप टाळण्यासह आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.आहे. - अरुण मुळाणे, उपाध्यक्ष, नाशिक ऍग्रो डीलर्स असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

Soybean Crop Disease Management: सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना

SCROLL FOR NEXT