Bailgada Sharyat Agrowon
ॲग्रो विशेष

Bailgada Sharyat In Soalpur : हराळवाडीत बैलगाडा शर्यतीने रंगत

मोहोळ तालुक्यातील हराळवाडीत सालाबादाप्रमाणे ग्रामदैवत गुरू रेवणसिद्ध यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Solapur News : मोहोळ तालुक्यातील हराळवाडीत सालाबादाप्रमाणे ग्रामदैवत गुरू रेवणसिद्ध यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत खुला गट व आदत गट असे वर्गीकरण केले होते.

खुल्या गटातून प्रथम क्रमांकासाठी कै. नागनाथ धोंडिबा हेगडे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा आणि अकरा हजार एकशे अकरा, द्वितीय क्रमांकासाठी ९९९९, तर तृतीय क्रमांकासाठी ७७७७ आणि चौथ्या क्रमांकासाठी ५५५५ रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

खुल्या गटातून प्रथम क्रमांक दत्ता हक्के (सोनके), द्वितीय क्रमांक नितीन निकम (जत), तृतीय क्रमांक वसंत गरंडे (नंदेश्‍वर), तर उत्तेजनार्थ बंडा स्वामी (कोरवली), आदत गटातून प्रथम क्रमांकासाठी ७७७७ रुपये द्वितीय क्रमांकासाठी ५५५५ क्रमांकासाठी ३३३३ व चौथे बक्षीस २२२२ होते.

आदत गटातून प्रथम क्रमांक निशांत पाटील (हराळवाडी), द्वितीय क्रमांक म्हाळू सोमुत्ते (शिवनगी), तृतीय क्रमांक बंडा पाटील (कारंडेवाडी), उत्तेजनार्थ केशव शेळके (हराळवाडी), तसेच सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह देण्यात आले.

दुपारच्या सत्रामध्ये मनोरंजन व समाज प्रबोधन पर कार्यक्रम झाले तसेच गावचे ओविकार मंडळाच्या ओव्यांचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कुस्ती मैदानात १०० पासून ते ५१ हजारांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या.

तर शेवटची कुस्ती पै. प्रताप हेगडे विरुद्ध पै. राहुल काळे यांच्यात वीस मिनिटांची लढत होऊन कुस्ती बरोबरीत सुटली. या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, लातूर, धाराशिव व कर्नाटक राज्यातील पैलवान वस्ताद मंडळी उपस्थित होती.

सदर कुस्ती मैदानात पै. बिरू हेगडे, पै. वाल्मीक माने, पै.गोपीनाथ घोडके, पै. विलास शेळके, पै. विठ्ठल हराळे, पै. रंगा शेळके, पै. सचिन हेगडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

या कुस्ती मैदानासाठी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे, राजूबापू धोडमिसे, दिलीप शेळके, केशव शेळके, रामचंद्र शेळके, उत्तम शेळके आदींनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT