Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : वर्षा बंगल्यावर घुसू म्हणणाऱ्या रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस

Ravikant Tupkar News : पीकविमा, सोयाबीन, कापूस आणि नुकसान भरपाईसह शेतकरी आत्महत्यांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Buldhana News : राज्यातील कापूस आणि सोयाबीनचे पडलेले दर, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि राज्यात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच तुपकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला होता. तसेच शुक्रवारी (ता. २३) शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षी बंगल्यावर घुसू, तेथेच शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवू, असं म्हटले होते. त्यावरून आता तुपरकरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे बुलढाण्यात सध्या खळबळ उडाली आहे.

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून तुपकर यांनी मंगळवारी (ता.२०) पत्रकार परिषद घेऊन चिंता व्यक्त केली होती. यावेळी तुपकर यांनी राज्यातील शेतकरी-शेतमजूर आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनिय झाली असून याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते. तसेच सोयाबीन, कापूससह इतर शेती पिकांचे पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मात्र राज्य सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे सरकारला जागे करत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांसह आंदोलन करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकिय निवासस्थान वर्षा बंगल्यात घुसू, शेतकरी कसा आत्महत्या करतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवू, असा इशारा तुपकर यांनी दिला होता.

त्यानंतर आता बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली असून त्यांना नोटीस बजावली आहे. तर कायदा आणि सुव्यवस्था पाहता कोणत्याही पद्धतीचे आंदोलन करू नये, असे आवाहन केले आहे. यावेळी बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी तुपकर यांना कलम १६८ नुसार नोटीस बजावली असून आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न!

दरम्यान, तुपकर यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसनंतर तुपकर यांनी, अशा नोटीसला आणि पोलिस कारवाईला आपण भीत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर पोलीस कारवाईचा धाक दाखवून सत्ताधारी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पोलिस नोटीसांनी घरातील कपाट भरले असून जीव गेला तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतच राहणार असल्याची ठाम भूमिका तुपकरांनी घेतली आहे.

काय म्हणाले होते तुपकर?

मंगळवारी तुपकर यांनी सरकारला इशारा देताना, सरकारने शेतकऱ्यांच्या पूर्ण मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा २३ तारखेला शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसू आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांना दाखवू असा इशारा तुपकरांनी दिला होता. तसेच महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. या प्रश्नावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. निवडणुकीच्या आधी सोयाबीनला ९ हजार आणि कापसाला १२ हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी केली होती.

सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहू नये

कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या २५८ जागांचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सरकारने या विद्यार्थ्यांचा अंत न बघता तातडीने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी. या विद्यार्थ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे असून वेळ प्रसंगी या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरू असेही तुपकर यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT