Galmult Dharan Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukt Dharan Yojana : बुलडाण्यात १०९ प्रकल्पांत गाळ काढण्याची मोहीम

Water Conservation : मे महिन्यात देखील उन्हाची तीव्रता अधिक असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे, संभाव्य पाणी टंचाईचा धोका नाकारता येत नाही.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढत चालली आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलली आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर काही गावात विहीर अधिग्रहण करुन उपाययोजना केल्या आहे.

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत तब्बल १०९ प्रकल्पांतील गाळ काढण्याचे काम जिल्ह्यात प्रगतिपथावर आहे. यामुळे पावसाळ्यात धरणांची जलपातळी वाढण्यात मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पाणीसाठ्याची सध्याची स्थिती विचारात घेता, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने योग्य आणि प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. पाणी आडवा पाणी जिरवा आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे आणि नद्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या तब्बल १०९ प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

मे महिन्यात देखील उन्हाची तीव्रता अधिक असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे, संभाव्य पाणी टंचाईचा धोका नाकारता येत नाही. तत्पूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात एप्रिल महिन्यामध्येच पाणी टंचाईची चिन्हे दिसून आली.

मेहकर, लोणार तालुक्यांत पाणीटंचाई उद्भवल्याचे चित्र दिसून आले. प्रकल्पातील गाळ शेतकरी शेतांमध्ये टाकत आहेत. या गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. शिवाय गाळ मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे ती हलक्या आणि मध्यम जमिनींसाठी खूप उपयुक्त ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT