Buldana Urban Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Buldana Urban Warehouse : ‘बुलडाणा अर्बन’ने तयार केली नऊ लाख टन क्षमतेची साठवणूक क्षमता

 गोपाल हागे

Akola News : महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी बँक म्हणून ओळख निर्माण झालेल्या बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीने वेअर हाऊस क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. राज्यात स्वःबळावर सुमारे नऊ लाख टन अन्नधान्य साठवण्याची क्षमता असलेली गोदामांची साखळी उभी केली आहे. शिवाय आता शीतगृहाच्या क्षेत्रातही काम हातात घेतले असून, एक लाख टनाची क्षमता तयार केली आहे. याचा राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी, साठवणूकदार, खरेदीदार फायदा घेत आहेत, अशी माहिती बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना दिली.

देशात उत्पादित होणाऱ्या एकूण अन्नधान्यापैकी दर वर्षी १० ते १२ टक्के अन्नधान्य हे व्यवस्थित साठवणुकीअभावी खराब होत असते. यामुळे केंद्र सरकारने देशात आता अन्नधान्य साठवणुकीच्या पर्याप्त सुविधा तयार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. बुलडाणा अर्बनने या क्षेत्रात दोन दशकांपूर्वीच काम सुरू केले होते. बाजारपेठेत ज्यावेळी भाव वाढेल तेव्हा शेतकरी आपला माल विक्री करू शकतो.

तोपर्यंत साठवणूक केलेल्या धान्याची व्यवस्थित देखरेख, काळजी घेतली जाते. आज राज्याची साठवणूक क्षमता २३ लाख टनांची आहे. तर, बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या धान्य गोदामांची नऊ लाख टनांची क्षमता तयार झाली आहे. बुलडाणा अर्बनचे स्वतःचे ४१० वेअर हाऊस आहे. शिवाय २६५ वेअर हाऊसेस भाडेतत्वावर घेऊन धान्य साठवणुकीची सुविधा दिली जाते. स्वतः नऊ शीतगृहेसुद्धा उभारली असून ११ भाड्याने घेतलेली आहेत.

मध्य प्रदेश बराच पुढे

अन्नधान्य साठवणुकीच्या क्षेत्रात सध्या महाराष्ट्रात मोठा वाव आहे. राज्याची २३ लाख टन साठवणुकीची क्षमता आहे. तर, बुलडाणा अर्बनची नऊ लाख मेट्रिक टनांची आहे. मात्र, शेजारच्या मध्य प्रदेशाची हीच अन्नधान्य साठवण्याची क्षमता आपल्यापेक्षा मोठी म्हणजे १६७ लाख टनांची तयार झालेली आहे. महाराष्ट्राला या क्षेत्रात आणखी बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

आपल्या देशात दर वर्षी जितके अन्नधान्य खराब होते तितक्यामध्ये काही गरीब देशातील नागरिकांचा वर्षभराचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इतकी ही हानी आहे. वास्तविक शेतकऱ्याने घाम गाळून हे अन्नधान्य उत्पादित केलेले असते. केवळ साठवणुकीची क्षमता तसेच योग्य व्यवस्थापनाची माहिती नसल्याने हे होत आहे. या क्षेत्रातील गरज लक्षात घेत बुलडाणा अर्बनने वेअर हाऊसेस तयार केले. यातील बहुतांश स्वतःच उभारणी केलेत, तर काही भाडेतत्वावर घेऊन साठवणुकीची सुविधा दिली जात आहे. या क्षेत्रात आणखी मोठा टप्पा आम्हाला गाठायचा आहे.
राधेश्याम चांडक, अध्यक्ष, बुलडाणा अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Central government flood help : केंद्राकडून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपयांची मदत जाहीर

Indian Education : नागरिक घडविणारे ‘बुनियादी’ शिक्षण

Maharashtra Cabinet Decision : निर्णयांचा पाऊस, अंमलबजावणीचे काय?

Kondhane Dam Project Scam : कोंढाणे धरण प्रकल्पात १४०० कोटींचा घोटाळा

Namo Shetkari Mahasanman Scheme : ‘नमो महासन्मान’च्या पाचव्या हप्त्यासाठी २२५४ कोटी

SCROLL FOR NEXT