Popatrao Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Popatrao Pawar : एकोप्यातूनही आदर्श गावाची उभारणी : पोपटराव पवार

गावाच्या विकासासाठी पैसाच महत्त्वाचा नसून सर्व भेदभाव सोडून एकजुटीने, स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन प्रयत्न केले तर आदर्श गाव निर्मिती होऊ शकते.

Team Agrowon

Chandrapur News : ‘मिशन जयकिसान’ अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथे हिवरे बाजार येथील राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी आदर्श गाव संकल्पनेबाबत शेतकरी व सरपंचांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मनुसंधान भू - वैकुंठ अड्याळ टेकडीची विश्वस्त मधुकर तुंडूळवार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती शिंदे, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शिवदास कोरे, तसेच सरपंच व शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

पोपटराव पवार म्हणाले, की गावाच्या विकासासाठी पैसाच महत्त्वाचा नसून सर्व भेदभाव सोडून एकजुटीने, स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन प्रयत्न केले तर आदर्श गाव निर्मिती होऊ शकते.

तसेच गावांचा विकास पैशातून कमी व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातून शाश्वत, आनंददायी व सर्वांगीण होण्याची खात्री आहे.

पाण्याचे नियोजन, पीक बदल, खतांचा कार्यक्षम वापर, सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन केले. गावातील प्रत्येक कामाची गुणवत्ता राखण्याचे पवित्र काम आपल्या हातून घडावे, असे त्यांनी सर्व सरपंच, ग्रामस्थ यांना आवाहन केले.

गावातील तंटामुक्त समित्या सक्रिय करून गोरगरिबांचा मेहनतीचा व घामाचा पैसा मुलाबाळांच्या विकासासाठी लावणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT