Nursery Agrowon
ॲग्रो विशेष

Nursery Farming : शास्त्रशुद्ध रोपवाटिका उभारणीद्वारे ‘कृषी’ला बळकटी द्या : डॉ. बाबर

Agriculture News : कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव व आत्मा, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘केव्हीके’त येथे ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण या विषयावर शेतकऱ्यांसाठी पाच दिवसांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

Team Agrowon

Satara News : कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव व आत्मा, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘केव्हीके’त येथे ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण या विषयावर शेतकऱ्यांसाठी पाच दिवसांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षण दरम्यान प्रो ट्रे तंत्रज्ञान वापरून भाजीपाल्याची व ऊस रोपे तयार करणे, फळपिकांची कलम बांधण्याचे प्रात्यक्षिक, ठिबक संचाची निवळ व देखभाल, संरक्षित गृहाची माहिती तज्ज्ञांनी दिली.

प्रशिक्षणचे प्रमाणपत्र वितरणाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी श्री राहुल माने उपप्रकल्प संचालक आत्मा सातारा,डॉ दर्शन कदम व डॉ महेश बाबर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना श्री माने म्हणाले, की ग्रामीण युवकांनी रोपवाटिका व्यवसाय करून चांगल्या दर्जेदार कलमांची उपलब्धता करावी.

श्री यादगीरवार म्हणाले, की प्रशिक्षणा दरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीचा वापर करून शास्त्रशुद्ध रोपवाटिका उभारणी करावी. त्यासाठी प्रत्येक पावलावर आत्मा व कृषी विज्ञान केंद्राची मदत मिळणार असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश बाबर यांनी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.पुढे ते म्हणाले की ग्रामीण युवकांनी कृषी क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला तर मोठी क्रांती घडू शकते. श्रीकांत घोरपडे यांनी ऊस रोपवाटिका तंत्रज्ञान व दर्शन कदम यांनी स्ट्रॉबेरी रोपवाटिका संदर्भात माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT