Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Fertilizer Stock : शेतकऱ्यांना मिळणार वेळेत रासायनिक खते

Chemical Fertilizer :खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खते वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळावीत, यासाठी प्रशासनाकडून युरिया आणि डीएपी या अत्यावश्यक रासायनिक खतांचा संरक्षित (बफर) साठा तयार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खते वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळावीत, यासाठी प्रशासनाकडून युरिया आणि डीएपी या अत्यावश्यक रासायनिक खतांचा संरक्षित (बफर) साठा तयार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

युरियाचा सात हजार ५०० टन आणि डीएपीचा एक हजार टन साठा राखीव ठेवण्यात येणार असून, यामुळे हंगामात अचानक निर्माण होणाऱ्या टंचाईला तोंड देणे शक्य होईल, तर डीएपी खताऐवजी पर्यायी खताचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही कृषी विभागाकडून सांगितले आले.

खरीप हंगामासाठी तयारी कृषी विभागाकडून करण्यात आली असून, यंदाच्या हंगामात पेरण्या वेळेत होणार असल्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने बियाणे व रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी नियोजन केले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होते. यामध्ये प्रामुख्याने भात, सोयाबीन, बाजरी, मका, नाचणी, भुईमूग, मूग, तूर आणि उडीद यांचा समावेश आहे. मागील तीन हंगामात बियाण्यांची सरासरी ३४ हजार क्विंटल विक्री झाली होती.

एक लाख ९६ टन खतसाठा मंजूर

रासायनिक खतांच्या बाबतीतही यंदा पुरेसा साठा उपलब्ध असून एकूण एक लाख ९६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके अशा विविध प्रकारच्या खतांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना पीक लागवडीच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये संरक्षित साठा ठेवला जाणार आहे.

दृष्टिक्षेपात

चांगल्या पावसाच्या अपेक्षेनुसार सुमारे ४८ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसे बियाणे सहज होणार उपलब्ध होणार

मॉन्सून वेळेवर आणि समाधानकारक असल्यास जिल्ह्यात उत्पादनात वाढ होण्याची शक्यता

प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन

कृषी विभागाचा पीक सल्ला केंद्रांद्वारे शेतकऱ्यांशी संवाद वाढवण्यावर भर

डीएपी खताच्या उपलब्धतेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्या ऐवजी युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट खतांचा एकत्र वापर केल्यास तो फायदेशीर ठरेल. याशिवाय डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट (टीएसपी) एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डीएपी खतास चांगला पर्याय आहे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT