Budget Session 2025  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Budget Session 2025 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; संपूर्ण कर्जमाफीसह भावांतर, बोनसची मागणी

Budget Session : राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ३ मार्च ते २१ मार्च कालावधीत अधिवेशन होणार आहे.

Dhananjay Sanap

: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (ता.३) सुरुवात झाली आहे. १० मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर राज्यातील कापूस, सोयाबीन तूर प्रश्न आणि कर्जमाफीवरुन विरोधी पक्षाने अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

तसेच कृषी खात्याचे आजी-माजी मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माजी कृषिमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पीक विमा गैरव्यवहार, डीबीटी घोटाळा आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आरोप केले जात आहेत.

तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सरकारी सदनिका प्रकरणी कागदपत्रात फेरफार करून लाभ मिळवण्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठवली आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यासाठी विधीमंडळात सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ३ मार्च ते २६ मार्च कालावधीत अधिवेशन होणार आहे.

यामध्ये एकूण कामकाजाचे १५ दिवस आहेत. आज विधीमंडळात पुरवण्या मागण्या मांडल्या जाणार आहेत. तसेच पुढील दोन दिवस पुरवण्या मागण्यावर चर्चा करून मंजूरीसाठी सभागृहासमोर ठेवण्यात येणार आहेत. तर १० मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतीमालाला किफायतशीर दर मिळत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची उत्पादकता घटली आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन कापूससाठी भावांतर, तुरीसाठी बोनस आणि निवडणुकीपूर्वी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन महायुती सरकारने पूर्ण करावं, अशी अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT