Bribery Arrest Agrowon
ॲग्रो विशेष

Bribery Arrest : जमीन मोजणीचा नकाशा देण्यासाठी शिपायाने मागितली लाच

Bribe For Land Survey : निफाड उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई नितेंद्र काशिनाथ गाडे यास साडेतीन लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

Team Agrowon

Nashik News : निफाड उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई नितेंद्र काशिनाथ गाडे यास साडेतीन लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. शिपायाने चार लाख रुपये लाच मागितल्याचे उघड झाले आहे.

धक्कादायक म्हणजे यात वरिष्ठाचे नावाचा वापर करण्यात आला. मात्र शेतकऱ्याने धाडस केल्याने हा प्रकार उघड झाला आहे. निरंकुश प्रशासनावर अंकुश कधी लागणार, असा सवाल आता शेतकरी करताना दिसत आहेत.

तक्रारदाराच्या मावशीची दीक्षी (ता. निफाड) येथे शेतजमीन आहे. सदर शेतजमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे २५ जानेवारी रोजी अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जमिनीची भूमि अभिलेख कार्यालय येथून २८ फेब्रुवारी रोजी मोजणी झाली होती.

परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या. शेतकऱ्याने गेली दोन महिने सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र कार्यालयातील प्रशासनाने त्याला अजिबात दाद दिली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याचा फायदा कार्यालयातील शिपायाने घेतला.

संबंधित काम दिलेल्या तारखेस ७ मार्च २०२५ रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात ६ मार्च रोजी स्वतःसाठी व भाबड यांच्या नावे ४ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३.५० हजार रुपये लाचेची मागणी करून ही लाचेची रक्कम ७ मार्च रोजी स्वीकारल्यानंतर रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT