Playhouse Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Techniques : पीक उत्पादन वाढविणारे सुधारित तंत्र

Crop Yield : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या प्रक्षेत्रावर पॉलिहाउस, शेडनेटमधील पीक व्यवस्थापनासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

यशवंत जगदाळे,

Crop Management Techniques : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या प्रक्षेत्रावर पॉलिहाउस, शेडनेटमधील पीक व्यवस्थापनासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भाजीपाल्याचे दर्जेदार उत्पादन मिळते. झाडांची जोमदार वाढ होते. उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत आहे.

पॉलिहाउस, शेडनेटमध्ये एक ओळ लागवड पद्धत

जुन्या दोन ओळ लागवड पद्धतीमध्ये रोपांची गर्दी आणि कॅनॉपी व्यवस्थापनासाठी अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन नवीन पद्धतीमध्ये रोपांची संख्या वाढून, कीड-रोग नियंत्रण, आंतर मशागत करता येते. तसेच सर्व फांद्यांना एकसारखा सूर्यप्रकाश मिळतो.

ग्रो फॅब्रिक कव्हर / पॉलिइस्टर कापड (८० जीएसएम)

रंग ः पांढरा

तंत्रज्ञानाचे फायदे

३० टक्के उत्पादन खर्च कमी, उत्पादनात वाढ होते.

भाजीपाला, फळवर्गीय पिकांना संरक्षण मिळते.

वापरण्यास सोपे व उत्पादनास फायदेशीर. पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म वातावरण निर्मिती.

केळी बंच कव्हर (३१.५० X ४० इंच)

तंत्रज्ञानाचे फायदे

हे एक विशेष प्रकारचे कव्हर आहे. वातावरणातील बदलांपासून संरक्षण मिळाल्याने फळांची गुणवत्ता सुधारते, उत्पादन वाढते.

पक्ष्यांपासून घडाचे संरक्षण, फळावरील ठिपके व बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण.

घडाची चकाकी व एक समान फण्या तयार होण्यास फायदेशीर.फळांचे नुकसान कमी होते.

- यशवंत जगदाळे, ९६२३३८४२८७,  ०२११२-२५५५२७, (भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT