ST Bus  Agrowon
ॲग्रो विशेष

ST Bus Booking : : शैक्षणिक सहलीसाठी ३०६ बसेसचे बुकिंग

Swargate ST Stand : स्वारगेट आगार आघाडीवर; एसटीला पसंती

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : शैक्षणिक सहलीचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शाळांकडून एसटी बसला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. यंदा एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुणे एसटी विभागाच्या १३ आगारांतील ३०६ एसटी बसेसचे डिसेंबरमध्ये शैक्षणिक सहलीसाठी बुकिंग झाले आहे.

प्रत्येक वर्षी साधारण दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शैक्षणिक सहली सुरू होतात. शैक्षणिक संस्थांकडून साधारण डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांत प्रामुख्याने शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. एसटी महामंडळाकडून सरकार मान्यता असलेल्या शाळांना शैक्षणिक सहलीसाठी ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे एसटीला शैक्षणिक सहलीसाठी मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

पुणे विभागातील १३ आगांरातून एक ते २१ डिसेंबरपर्यंत २१७ बस शैक्षणिक सहलीसाठी देण्यात आल्या होत्या. तर ३१ डिसेंबरपर्यंत आणखी ८९ बस देण्यात येतील. शैक्षणिक सहलीसाठी बुकिंगमध्ये स्वारगेट आगार आघाडीवर आहे.

येथून ४० बस बुकिंग झाल्या आहेत. त्यानंतर इंदापूर आगारात ३९ बस आणि बारामती आगारात ३५ बस बुकिंग झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड आगारात केवळ १७ बस बुकिंग झाल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के सवलत
शैक्षणिक सहलीमध्ये एसटीचा प्रवासा सुखाचा व्हावा, यासाठी विशेष नियमावली आणि सवलत देण्यात येते. शैक्षणिक सहलीसाठी दरामध्ये ५० टक्के सवलत आहे. सहलीत सहभागी होणाऱ्यांची सर्व माहिती एसटी महामंडळाला देणे बंधनकारक आहे. बसमध्ये १२ वर्षांपुढील ४० तर १२ वर्षांच्या आतील ६० मुलेच बसमध्ये घ्यावीत. एसटीचा अपघात झाल्यास मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना फॉर्म भरून दिल्यावर १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक नुकसानभरपाई मिळते.

विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के सवलत
शैक्षणिक सहलीमध्ये एसटीचा प्रवासा सुखाचा व्हावा, यासाठी विशेष नियमावली आणि सवलत देण्यात येते. शैक्षणिक सहलीसाठी दरामध्ये ५० टक्के सवलत आहे. सहलीत सहभागी होणाऱ्यांची सर्व माहिती एसटी महामंडळाला देणे बंधनकारक आहे.

बसमध्ये १२ वर्षांपुढील ४० तर १२ वर्षांच्या आतील ६० मुलेच बसमध्ये घ्यावीत. एसटीचा अपघात झाल्यास मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना फॉर्म भरून दिल्यावर १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक नुकसानभरपाई मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Rahul Mahiwal: ‘कृषी उद्योजक’ घडविणारी व्यवस्था आणू

PICNIC Farming Technology: ‘पिकनिक’ शेती, अर्थात निसर्गसिद्ध संजीवन शेती

Strawberry Pest Control: स्ट्रॉबेरीवरील लाल कोळी

Germany Agriculture Technology: गुट स्टाइनहॉफ जर्मनीतील शेतीची अनोखी गाथा

Interview with Sunil Patil: दरवाढीच्या संकटातही शेतकरी हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT