Maharashtra Budget Session 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Session 2023 : बोगस बियाणे कायदा लांबणीवर; विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे

Bogus Seed Bill : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोगस बियाणे, खतांविषयीचे विधेयक मांडणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते.

Team Agrowon

Assembly Monsoon Session 2023 : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (ता. ४)  विधानसभेत  बोगस बियाणे, खते आणि किटकनाशकासंबंधीची चार विधेयके संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. सभागृहाने त्यास मंजुरी दिल्याने आता पुढील अधिवेशनात या विधेयकांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (ता. ८) शेवटचा दिवस आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस बियाणे, खते आणि किटकनाशकांसंबंधीची पुढील चार विधेयके सभागृहात सादर केलीः 

१.  महाराष्ट्र राज्यातील भेसळयुक्त, अप्रमाणित किंवा गैरछापाची बियाणे, खते किंवा किटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरिता विशेष तरतुदी करण्याकरिता विधेयक.

२. अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५, महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक.

३. किटकनाशके अधिनियम, १९६८, महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात सुधारणा करण्याकरिता विधेयक.

४. बियाणे अधिनियम, १९६६, महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात  सुधारणा करण्याकरिता विधेयक. 

ही विधेयके क्रमांक ४०, ४१, ४२ आणि ४३ विधान परिषदेत संमती घेऊन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या २५ सदस्यांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.  

खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यभरात अनेक ठिकाणी बोगस बियाणे, खते विक्रीच्या घटना घडल्या. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोगस बियाणे, खते आणि किटकनाशक विरोधी विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमडळ उपसमिती गठीत करण्यात आली. या समितीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश होता.

ही विधेयके संयुक्त चिकित्सा समितीकडे गेल्यामुळे पुढील अधिवेशनातच नवीन कायद्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT