Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Black-Market : लातुरात मागणी असलेल्या बियाण्यांचा काळाबाजार

Seed Shortage : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच बियाणे विक्रेत्यांची लॉबी सक्रिय झाली असून, त्यांनी मोठी मागणी असलेल्या तसेच शेतकऱ्यांच्या पसंतीच्या बियाणे व खतांचा काळाबाजार सुरू केला आहे.

Team Agrowon

Latur News : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच बियाणे विक्रेत्यांची लॉबी सक्रिय झाली असून, त्यांनी मोठी मागणी असलेल्या तसेच शेतकऱ्यांच्या पसंतीच्या बियाणे व खतांचा काळाबाजार सुरू केला आहे.

पेरणी सुरू होताच बियाण्यांची टंचाई होत असल्याने शेतकरी आतापासून बियाणे खरेदीची धावपळ करत आहेत. या शेतकऱ्यांना काळ्याबाजाराचा अनुभव येत असून, त्यांना जादा दराने बियाण्यांची खरेदी करावी लागत आहे.

या प्रकाराकडे कृषी विभागाचे लक्ष नसल्याने विक्रेते मागणी असलेल्या बियाण्यांची साठेबाजी करून त्याचा काळाबाजार करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने कापसाचे पीक घेतात.

विशिष्ट दोन वाणांच्या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. काही वर्षांतील शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन विक्रेत्यांनी या दोन्ही वाणांची साठेबाजी सुरू केली असून, सध्या हे दोन्ही वाण सध्या बाजारातून गायब आहेत.

वाणाची एमआरपी ८५० रुपये असताना काळा बाजारात ते तेराशे ते चौदाशे रुपयांना विक्री केली जात आहे. शेजारील नांदेड जिल्ह्यात हे बियाणे शेतकऱ्यांना आधारकार्ड व सातबारा उतारा पाहून विक्री केले जात आहे.

जिल्ह्यात बियाणे खरेदीसाठी गेल्यानंतर विक्रेते डीलरकडूनच बियाणेच आले नसल्याचे सांगतात, तर डीलरकडून लातूर जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र नसल्याने बियाणे कसे उपलब्ध करायचे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

त्यापुढे जाऊन काही विक्रेत्यांकडून कंपनीने संबंधित वाणांच्या बीजोत्पादनासाठी केलेले सीड प्लांट फेल गेल्याने बियाण्यांचा तुटवडा झाल्याची आवई उठवली जात असून जादा पैसे देणाऱ्यांना बियाणे दिले जात आहे.

या गोंधळात काळ्याबाजारात विक्री होत असलेल्या बियाण्यांच्या दर्जा व गुणवत्तेचीही धास्ती शेतकऱ्यांना आहे. सध्या या बियाण्यांचा काळ्याबाजारातील भाव लक्षात घेता प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी तो दोन हजारांपर्यंत जाण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करत आहेत.

या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांची तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अशा विक्रेत्यांची नावे कृषी विभागाला कळवण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांचा कापूस लागवडीचा कल बघून विक्रेते पसंतीच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई करत आहेत. अशा विक्रेत्यांची लॉबी मजबूत असून, लॉबीची बियाण्यांच्या उपलब्धतेवर पकड आहे. काळ्या बाजाराची तक्रार केल्यास पुन्हा खते व कीटकनाशके न देण्याची भाषा केली जात आहे. विक्रेते व कृषी विभागांतील मायाजालात शेतकरी अडकले आहेत.
- भारत येरणे, शेतकरी, वळसंगी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT