CM Eknath Shinde agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, शेतकरी संघटना आक्रमक

Swabhimani Shetkari Sanghatana : गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन १०० रुपये देण्याच्या मागणीवरून काळे झेंडे दाखवण्यात आले.

sandeep Shirguppe

Swabhimani Shetkari Sanghatana Protest : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. हातकणंगले तालुक्यातील कोरोची या गावामध्ये महिला सशक्तीकरण या कार्यक्रमाबरोबर ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली. गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन १०० रुपये देण्याच्या मागणीवरून काळे झेंडे दाखवण्यात आले.

गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन १०० रूपयाचा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांव -हातकंणगले रोडवर काळे झेंडे दाखविण्यात आले.

राज्य सरकारने दोन महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० रूपयाचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी स्वत: मध्यस्थी करून पुणे-बंगळुरू महामार्गावरील आंदोलन स्थगित केले होते. जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी १०० रूपये देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. मात्र राज्य सरकार ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे.

जवळपास ३ महिने झाले तरीही शासनाने निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठिशी राहिल्याने संतापलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनार्थ डिजीटल फलक आणि काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

या बोर्डवर १०० रूपयाचा दुसरा हप्ता बुडवून, एफ. आर. पीचे तुकडे करून शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात पेन नाही दगड घ्यायला लावणारे सरकार, मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका, कारखानदारांना पाठीशी घालू नका, ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता १०० रूपये तातडीने द्या अशा आशयाचे फलक दाखविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT