Sugarcane FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : उसाला दुसरा हफ्ता ४०० द्या, भाजपची साखर आयुक्तांकडे मागणी

BJP Kisan Morcha : उसाला दर देण्यासाठी भाजप किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली.

sandeep Shirguppe

Sugar Rate : मागील वर्षी साखर कारखान्यांनी साखर आणि इथेनॉल विक्रीतून जादा रक्कम मिळवली आहे. तसेच साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉल उत्पादन करण्यात आले आहे. तीन ते चार टक्के रिकव्हरी इथेनॉल निर्मितीसाठी वापरली आहे. यामुळे कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले आहेत.

यामुळे यंदा साखर कारखानदारांना शेतकऱ्यांना पैसे देता येतात यामुळे एकरकमी एफआरपीसह चारशे रुपये फरक देण्यात यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली.

दरम्यान दुसरीकडे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात उसाला ४०० रुपये दुसरा हफ्ता मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. याचवेळी भाजपनेही ही मागणी लावून धरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मागणीला भाजपनेही बळ दिल्याचे बोलले जात आहे.

यावेळी भाजपने साखर आयुक्तालयातर्फे साखर कारखानदार व शेतकरी प्रतिनिधींची बैठक लावण्यात यावी, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, जिल्हास्तरावर साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या समन्वय बैठकीत भाजप किसान मोर्चाचे प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात यावे, आदि मागण्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आल्या.

यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस संदीप गिड्डे - पाटील, प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, माउली हळणवर, मनोज कासवा, जयेश शिंदे, भगवान काटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्रांती भुसनर, नितीन गडदरे, राहुल भोसले, तानाजी थोरात, सचिन मचाले आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Karjmafi : कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचां उद्रेक होईल; डॉ. अजित नवलेंचा सरकारला इशारा

Indian Politics: किसमें कितना है दम!

Cotton Market : कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावात का?

Parliament Monsoon Session : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात कॉँग्रेसचे सरकारला आठ प्रश्न

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

SCROLL FOR NEXT