Solapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC Election : सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप-काँग्रेस एकत्र लढणार

Solapur Market Committee : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेलसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेतला असून, निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेलसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेतला असून, निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे.

त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, भाजपचे शहाजी पवार, अविनाश महागावकर, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील असे सर्वपक्षीय नेते एकत्रित आले आहेत. स्वतः कल्याणशेट्टी यांनीच सोमवारी (ता.१४) आम्ही सर्वजण एकत्रित लढणार आहोत, अशी घोषणा केली.

दरम्यान, भाजपचे आमदार आणि माजी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी मात्र अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते तालुक्यात या निवडणुकीच्या अनुषंगाने फिरत आहेत, चाचपणी करत आहेत. ते स्वतंत्र पॅनेलद्वारे लढणार की या पॅनेलमध्ये येणार, याविषयीची उत्सुकता आहे. आमदार कल्याणशेट्टी यांनी सोमवारी काँग्रेसचे नेते, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह खास पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

त्याशिवाय भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर आदी उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख मात्र अनुपस्थित होते, त्यांनाही आम्ही आवाहन केले आहे, त्यांच्याशी चर्चा झाली आहे, मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळे आमची ती इच्छा आहे, असे आमदार कल्याणशेट्टी म्हणाले.

काँग्रेस नेते, माजी आमदार दिलीप माने म्हणाले, की आम्ही सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतो आहोत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्हाला गरज आहे, म्हणून हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे म्हणाले, की गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विजयकुमार देशमुख होतेच की, यावर्षी आम्ही कल्याणशेट्टी यांच्यासोबत राहतो आहोत. जिल्हा बँक, बाजार समिती या निवडणुका राजकारणाच्या पलीकडच्या आहेत, त्याचा विचार करूनच आम्ही एकत्र आलो आहोत. दरम्यान, आमदार सुभाष देशमुख यांची भूमिका काहीही असली, तरी सद्यःस्थितीत भाजप आणि काँग्रेस एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील, आम्ही आमच्या पॅनेलची घोषणा १६ एप्रिलला करू, असेही आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT