Ramchandra Bhojane and Ratnakar Dhage Agrowon
ॲग्रो विशेष

Prime Minister Interaction : बायोगॅस वापरणाऱ्या दोघांना पंतप्रधानांशी संवादाची संधी

Biogas Users Farmers : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतूळ (ता. अकोले) येथील रामचंद्र गणपत भोजने व नांदेड जिल्ह्यातील सायल (ता. लोहा) येथील रत्नाकर गंगाधर ढगे या राज्यातील दोन शेतकऱ्यांना २६ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.

सुर्यकांत नेटके

Ahilyanagar News : बायोगॅस वापरून वीज, इंधनाची बचत करण्याबाबत सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. त्या अनुषंगाने बायोगॅस सयंत्र वापरणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतूळ (ता. अकोले) येथील रामचंद्र गणपत भोजने व नांदेड जिल्ह्यातील सायल (ता. लोहा) येथील रत्नाकर गंगाधर ढगे या राज्यातील दोन शेतकऱ्यांना २६ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.

वीज, इंधनावरील बचतीसाठी शासनाकडून सौरपंप, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बायोगॅस सयंत्राची उभारणी केली जात आहे. यातून घरच्या घरी इंधन, वीज तयार होते. संबंधित शेतकऱ्यांची आर्थिक बचतही होत असल्याचा अनुभव आहे. बायोगॅस सयंत्र वापरणाऱ्या देशभरातील मोजक्या शेतकऱ्यांसोबत २६ जानेवारी रोजी सायंकाळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.

त्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांना निमंत्रित केलेले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतूळ (ता. अकोले) येथील रामचंद्र गणपत भोजने व नांदेड जिल्ह्यातील सायल (ता. लोहा) येथील रत्नाकर गंगाधर ढगे या दोन शेतकऱ्यांना यात संवादाची संधी मिळाली आहे, ही माहिती अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली.

श्री. शिंदे म्हणाले, की मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर बायोगॅस सयंत्र उभारणीत राज्यात अग्रेसर आहे. निमंत्रित केलेल्या भोजने यांनी दोन वर्षांपूर्वी बायोगॅस उभारले असून, ते त्याची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. राज्यातील दोन शेतकऱ्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला पंतप्रधानांसमवेत संवाद करण्याची संवाद संधी मिळत असल्याचा अभिमान आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने याबाबत कळवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT