Rabi Season agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : परतीच्या पाऊस नसल्याने रब्बी पिकावर मोठा परिणाम, राज्यात फक्त २८ टक्के पेरण्या

Rain Condition : अल् निनोमुळे देशासह राज्यात पावसाने दडी मारल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Drought : अल् निनोमुळे देशासह राज्यात पावसाने दडी मारल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान खरिप हंगामात लाखो हेक्टर जमीनीत पेरण्या न झाल्याने खरिपाचे उत्पादन घटले आहे. तर अशीच परिस्थिती आता रब्बी हंगामाची होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. राज्यात परतीचा पाऊसच न झाल्याने रब्बी पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे.

मागच्या महिन्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाल्याने पेरण्याचे प्रमाण कमी होते. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामे होत असतात परंतु यंदा मात्र केवळ २८ टक्क्यांपर्यंतच पेरणी झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ५३.९७ लाख हेक्टर असून १६ नोव्हेंबरपर्यंत केवळ १५.११ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.

मागच्या सहा महिन्यात राज्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली तर ऑगस्ट महिन्यात १०२ वर्षातील निच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे यंदा भूजल पातळी घटल्याने पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

राज्यात जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतील पर्जन्य तूट, भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र व इतर निकष लक्षात घेऊन राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने यंदाच्या हंगामासाठी १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी यंदाच्या रब्बी हंगामाचा पीक पेरणी व पीक परिस्थितीचा साप्ताहिक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार रब्बी हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ज्वारी, हरभरा, गहू, मका व करडई पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. परंतु क्षेत्र घटणार असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT