Onion Export Ban agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका, कंटेनरमध्ये अडकलेला कांदा सडण्याची भिती

Onion Export Ban : कांद्याची निर्यातबंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रास्तारोको करण्याची हौस नाही. लोकांना त्रास देण्याची हौस नाही.

sandeep Shirguppe

Onion Export Ban News : केंद्राच्या निर्यातबंदीच्या निर्णयानंतर मुंबई बंदरात १७० कंटेनर अडकून पडले आहेत. याबबात तोडगा न निघाल्यास हा कांदा सडण्याची भीती व्यक्त होत असून निर्यातदारांना फटका बसणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या विषयावर उद्या (ता. ११) दिल्लीत बैठक बोलवली आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, याबैठकी अगोदरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांची भेट घेतली आहे. केंद्राने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत राहणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे कांदा व्यापारी आणि उत्पादक संतप्त झाले आहे. निर्यातीस पाठवण्यात येणारे तब्बल १७० कंटेनर मुंबईत अडकून पडले आहे, त्यामुळे निर्यातदारांना सुमारे पंधरा ते वीस कोटींचा फटका बसण्याचा अंदाज आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळताच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली, असा आरोप करत मुंबई-आग्रा चौफुलीवर शेतकरी उद्या (ता. ११) सकाळी दहा वाजता 'रास्ता रोको' आंदोलन केले.

साखर महाग होऊ नये म्हणून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणत शेतकरी, व्यापारी, शेतमजुरांना संपवण्याचा केंद्र सरकारने सपाटा लावला आहे, असाही आरोप करण्यात आला.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोमवारी (ता.११) शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यात आंदोलन केले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होत मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको केला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा विरोध केला. आंदोलक शेतकरी आणि नेत्यांनी यावेळी कांदा निर्यातीमुळे झालेल्या कोंडीची व्यथा मांडली.

पवार म्हणाले, "कांद्याची निर्यातबंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रास्तारोको करण्याची हौस नाही. लोकांना त्रास देण्याची हौस नाही. पण रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय दिल्लीला जाग येत नाही. आज आपण रस्त्यावर उतरलो. एकत्र जमलो. मला खात्री आहे, दिल्लीची (केंद्र सरकारची) झोप उडाली आहे. केंद्र सरकारमध्ये जे बसले आहेत, त्यांना जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त होईल." यावेळी पवारांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयावर टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Oil Market: सणांमुळे खाद्यतेलाची आयात वाढणार; सोयातेलाची आयात विक्रमी पातळीवर 

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Farm Road Model : शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आता राज्यभरात

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

SCROLL FOR NEXT