Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठ्यात मोठी घट

Water Crisis : या वर्षात झालेल्या अनियमित व अपुऱ्या पावसाचा फटका पिकांप्रमाणेच प्रकल्पांवरही झाला आहे.

Team Agrowon

Pune News : या वर्षात झालेल्या अनियमित व अपुऱ्या पावसाचा फटका पिकांप्रमाणेच प्रकल्पांवरही झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या व मध्यम प्रकल्पात सध्या अवघा ३० टक्के साठा असून मागील वर्षाच्या तुलनेत हा अर्धाच साठा असल्याने येत्या काळात टंचाईच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने खडकपूर्णासारखा मोठा प्रकल्प यंदा कोरडा असल्याने घाटावरील बहुतांश तालुक्यांना त्याचा फटका सहन करावा लागेल हे निश्‍चित झाले आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांच्या स्थितीचा आढावा घेतला असता मोठ्या प्रकल्पांपैकी नळगंगामध्ये २५.६२ दलघमी (३६.९५९ टक्के), पेनटाकळी १६.५१ दलघमी साठा असून २७.५३ टक्केवारी आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी प्रमुख खडकपूर्णा प्रकल्प फेब्रुवारीच्या मध्यातच कोरडा झाला आहे. या प्रकल्पात ० टक्के साठा आहे.

मध्यम प्रकल्पांत तुलनेने बरा साठा अद्याप आहे. यात ज्ञानगंगामध्ये २२.३६ दलघमी (६५ टक्के), मस ९.३३ (६२ टक्के), कोराडी ८.३५ (५५.०९), पलढग ३.१७ ( ४२.२१), मन ११.८० (३२.०४), तोरणा १.३९ ( १७.६२), उतावळी ६.७२ (३३टक्के) साठा आहे.

सर्व मध्यम प्रकल्प मिळून ६३.१० दलघमी साठा असून याची सरासरी टक्केवारी ४४.५३ आहे. वास्तविक गेल्या वर्षी या मध्यम प्रकल्पात तब्बल १०४.३५ दलघमी साठा होता. त्याची सरासरी टक्केवारी ७३.६५ एवढी होती. यावर्षी तुलनेने अर्धाच साठा शिल्लक राहलेला आहे.

लघू प्रकल्पांतील जेमतेम साठा

जिल्ह्यातील ३७ लघू प्रकल्पांत सध्या एकूण ३४.५७० दलघमी साठा शिल्लक आहे. सरासरीच्या ३४.८१ टक्के हा साठा आहे. मागील वर्षात या प्रकल्पात ५३.०२ दलघमी व ५३.३९ टक्के साठा होता. जवळपास २० टक्के पाणी या लघु प्रकल्पांमध्ये कमी आहे. सलग जोरदार पाऊस न झाल्याने बरेच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते.

जे भरले त्यातील पाण्याचा वापर, बाष्पीभवनामुळे फेब्रुवारीतच साठा कमी झालेला आहे. पुढील चार महिने पाण्याची मोठी मागणी वाढणार आहे. पुढील काळात वाढणारी मागणी पाहता हे पाणी उन्हाळाभर पुरेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

प्रकल्पांची स्थिती

प्रकल्प उपयुक्त साठा टक्केवारी मागील वर्षाची टक्केवारी

मोठे प्रकल्प ४२.१२७० दलघमी १८.९२ टक्के ६०.१२

मध्यम प्रकल्प ६५.१०० ४४.५३ टक्के ७२.६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Water Supply Quotation: चारा व पाणीपुरवठा दरपत्रक सादरीकरणाला मुदतवाढ; ८ जूनपर्यंत संधी

Cotton Seed Black Market: देशी कापूस बियाणांचा जळगावात काळाबाजार; शेतकऱ्यांची लूट

Urea Fertilizer Supply: अकोला जिल्ह्यात पाच दिवसांत ७,१०१ टन युरिया उपलब्ध होणार; शेतकऱ्यांना दिलासा

Sina River Water Release: सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढ्यात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Maize MSP Procurement: हमीभावाने खरेदी फक्त सात टक्केच

SCROLL FOR NEXT