APMC Market Agrowon
ॲग्रो विशेष

Oil Seed Market : मानोरी केंद्रावर भुसार, तेलबिया शेतीमाल लिलाव सुरू

APMC Market Update : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मानोरी खु.(फाटा) येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारपासून (ता. १४) भुसार व तेलबिया शेतीमाल लिलाव सुरू करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik News : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मानोरी खु.(फाटा) येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारपासून (ता. १४) भुसार व तेलबिया शेतीमाल लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. प्रारंभी बन्सीलाल केशव वावधाने (रा. मानोरी खु.)यांनी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून आणलेल्या सोयाबीन व इतर शेतीमालाचे सभापती क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द, देवगाव, शिरवाडे, वाकद, कानळद, खेडलेझुंगे, कोळगाव, भरवस, वाहेगाव, गोंदेगाव, गोळेगाव आदी गावांसह येवला, सिन्नर व लगतच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भुसार व तेलबिया शेतीमालाचे उत्पादन घेतले जाते.

त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसाठी भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री जवळच्या परिसरात करणे सोईचे व्हावे यासाठी भरवस मानोरी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी १ सप्टेंबर २०२३ रोजीचे पत्राद्वारे मानोरी खुर्द (फाटा) येथे भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करावेत, अशी बाजार समितीकडे मागणी केली होती.

या मागणीच्या अनुषंगाने बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून मानोरी खुर्द (फाटा) येथे भुसार व तेलबिया शेतीमालाचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यासाठी खात्याची मान्यता घेतली असून सदर खरेदी-विक्री केंद्रासाठी दीपक शिवाजी साबळे (रा. मानोरी खुर्द) यांनी त्यांची मालकी व कब्जे वहीवाटीची जागा व इतर अनुषंगिक सुविधा बाजार समितीस उपलब्ध करून दिल्या आहेत.

मंगळवारपासून (ता. १४) दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर या खरेदी-विक्री केंद्रावर भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करण्यात आले. भुसार व तेलबिया शेतीमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी आतापर्यंत ११ आडते व ११ अ वर्ग व्यापारी (खरेदीदार) यांनी बाजार समितीकडून अनुज्ञप्ती घेतल्या असून त्यांच्यामार्फत खरेदी-विक्रीचे कामकाज होणार आहे. या खरेदी-विक्री केंद्रावर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी ते शुक्रवारी (सुट्टीचे दिवस सोडून) या ५ दिवस सकाळी १० ते १ व दुपारी ३ ते ५ या वेळेत लिलावाचे कामकाज चालणार आहे.

बाजार समितीच्या लासलगाव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव होत असे. मात्र मानोरी खुर्द व परीसरातील शेतकरी मागणीनुसार बाजार समितीने प्रथमच मानोरी खुर्द येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू केले आहेत. लिलावाच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात ७० वाहनांतून वेगवेगळा भुसार व तेलबिया शेतीमाल विक्रीसाठी आला असून सोयाबीन ५,१११, मका २,१६१, गहू २,०००, बाजरी २,१००, हरभरा ५,४००, धने ८,३०० व करडई ४,५०० या सर्वसाधारण दराने विक्री झाली आहे. सूत्रसंचालन प्रकाश कुमावत व सुनील डचके यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT