Bhuibawda Ghat agrowon
ॲग्रो विशेष

Bhuibawda Ghat : भुईबावडा घाटरस्ता रविवारपर्यंत बंदच, फोंडाघाट मार्गे वाहतूक

sandeep Shirguppe

Bhuibawda Ghat : ढगफुटीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झालेल्या भुईबावडा घाटातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी या घाट मार्गातील अवजड वाहतूक रविवार (ता. १३) पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविली आहे.

वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा आणि करूळ घाट परिसरात २३ सप्टेंबरला ढगफुटीसदृश पाऊस झाला. भुईबावडा घाटात दहा ते बारा ठिकाणी दरडी कोसळल्या. रस्त्याची बाजूपट्टी खचली, याशिवाय काही ठिकाणी रस्ताही खचला. लहान मोऱ्यांचे पाईपही वाहून गेले. रस्त्याकडेला मोठ्या चरी पडल्‍या आहेत. त्यामुळे या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात अहवाल दिला होता.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत घाटमार्गे अवजड वाहतूक बंद केली होती. त्यानंतर आता पुन्हा हा घाटमार्ग दुरुस्तीकरिता १३ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात येणार आहे.

तरीही वाहतूक सुरू कशी?

प्रशासनाने भुईबावडा घाट मार्गे जड, अवजड वाहतूक बंद केली आहे. तरीही या घाटमार्गे रात्री आठनंतर जड, अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे ही वाहतूक सुरू कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांच्या मदतीची मागणी

Land Dispute : अति उत्साहीपणा आला अंगलट

Crop Loan : रब्बी हंगामात तेराशे कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Crop Insurance : वंचित शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा द्या

Return Monsoon : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसांपासून पुन्हा थबकला

SCROLL FOR NEXT