Women's self-help group Agrowon
ॲग्रो विशेष

Women's Self-help Group : कापशी रोड येथील महिला बचत भवनाचे भूमिपूजन

Rojgar Hami Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व आर. आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार निधी यांच्या माध्यमातून तालुक्यातील कापशी रोड येथे जिल्ह्यातील पहिले महिला बचत भवन उभारले जाणार आहे.

Team Agrowon

Akola News : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व आर. आर. पाटील सुंदर ग्राम पुरस्कार निधी यांच्या माध्यमातून तालुक्यातील कापशी रोड येथे जिल्ह्यातील पहिले महिला बचत भवन उभारले जाणार आहे.

या बचत भवनाचे भूमिपूजन शनिवारी (ता. १०) विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांच्या हस्ते झाले. बचत भवनाच्या निर्मितीमुळे महिलांच्या उत्पादित वस्तू विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे, असे प्रतिपादन केले.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी, कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण, जलजीवन मिशन प्रकल्पाचे संचालक मदन सिंह बहुरे आदींची उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त डॉ. पांडे यांनी महिला बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. त्यानंतर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील एकमेव गोबरधन प्रकल्पाची पाहणी केली.

या प्रकल्पामुळे गॅस व वीजनिर्मिती होणार असून, आजूबाजूच्या परिसरातील गोधन व शेती उत्पादनातील टाकाऊ घटकांचा वापर या प्रकल्पासाठी होणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याची माहिती या वेळी दिली.

कापशी रोड येथील शाळेच्या भिंतीवर बाल सुलभ चित्रांची रंगरंगोटीची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. या उपक्रमाचे कौतुक केले.

तसेच गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषद यंत्रणेचे कौतुक केले. या वेळी ग्रामपंचायतीचे प्रशासक सतीश सरोदे, माजी सरपंच अंबादास उमाळे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील राहुल गोडले, सागर टाकले आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT