Team Agrowon
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार हजार रुपये दिले जातात.
तीन हप्त्यांत २-२ हजार रुपये या हिशोबाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारही शेतकऱ्यांसाठी किसान कल्याण योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ४ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे.
किसान कल्याण योजनेंतर्गत मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेव्यतिरिक्त ४ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.
शेतकऱ्यांना ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केली जाते. अशाप्रकारे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी १० हजार रुपयांचा आर्थिक लाभ प्राप्त होतो.
महाराष्ट्र सरकारनेही पीएम किसान योजनेच्या धरतीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
नमो महासन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. पीएम किसान योजनेप्रमाणेच तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांचे एकत्रितपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे.