Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Bhima Sugar Factory : भीमा साखर कारखाना ‘मल्टिस्टेट’ करण्याला विरोध

Cooperative Dispute : भीमा सहकारी साखर कारखाना ‘मल्टिस्टेट’च्या पार्श्वभूमीवर सभासदांच्या वतीने ॲड. चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या बाबतची सुनावणी नुकतीच पार पडली.

Team Agrowon

Solapur News : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखाना ‘मल्टिस्टेट’ करताना कारखान्यावरील कर्ज न भरता तसेच सभासदांचे बहुमत नसताना, सभासदाच्या विरोधात हा निर्णय घेतला असून, हा निर्णय रद्द करावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती अॅड. महादेव चौधरी यांनी दिली. या संदर्भातील पुढील सुनावणी आता २५ जून रोजी होणार आहे.

भीमा सहकारी साखर कारखाना ‘मल्टिस्टेट’च्या पार्श्वभूमीवर सभासदांच्या वतीने ॲड. चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या बाबतची सुनावणी नुकतीच पार पडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोणताही कारखाना वा संस्था ‘मल्टिस्टेट’ करण्यासाठी शासनाने २०१४ मध्ये १ ते ११ मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत.

मात्र भीमा कारखाना मल्टिस्टेट करतेवेळी यातील एकाही अटीची व शर्तीची पूर्तता केलेली नाही. हा निर्णय बहुमताने होणे आवश्यक होते, मात्र या बाबतची सभासदांची कोणती ही बैठक पार पडलेली नाही. कारखान्यावरील कर्ज हे पूर्ण भरलेले असणे गरजेचे होते, मात्र कारखान्यावर कोट्यावधीचे कर्ज आहे.

त्यामुळे हा निर्णय सभासदांच्या विरोधात असून, हे ‘मल्टिस्टेट’ रूपांतर मूलभूत तत्त्वाला विरोध करून झाले आहे. त्यामुळे सभासद हिताच्या व सहकार चळवळीच्या विरोधात घेतलेला हा निर्णय रद्दबातल होणे आवश्यक असल्याचे म्हणणे उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत चौधरी यांनी नमुद केले आहे. यावर सुनावणी झाली, पण कोणताच निर्णय झाला नाही, आता पुढील सुनावणी २५ जूनरोजी होणार आहे.

आमची भूमिका योग्य आहे. आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाहीत कोणी काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यावर आम्हाला कुठलेही भाष्य करावयाचे नाही, योग्य वेळी योग्य उत्तर देऊ.
-विश्वराज महाडीक, अध्यक्ष, भीमा कारखाना, टाकळीसिकंदर
भीमा कारखाना मल्टिस्टेट करायला नको होता. मल्टिस्टेटमुळे ऊस तोडणी प्रोग्रॅम राबवणार नाही, परिणामी सभासदांचा ऊस गाळपास वेळेवर जाणार नाही. त्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा.
-सतीश जगताप, उपाध्यक्ष, भीमा कारखाना, टाकळीसिकंदर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT