Raosaheb Bhagde Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Commissioner : कृषी आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार भागडे यांच्याकडे

Agriculture Department : राज्याच्या कृषी आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार रावसाहेब भागडे यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्तपदावरून डॉ. प्रवीण गेडाम यांची ३१ मे रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या कृषी आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार रावसाहेब भागडे यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्तपदावरून डॉ. प्रवीण गेडाम यांची ३१ मे रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस कृषी आयुक्तपदाची जागा रिक्त ठेवली गेली. आयुक्तांची बदली करुन ऐन खरिपात कृषी विभाग वाऱ्यावर सोडण्यात आल्याची टीका होत होती. शेवटी या पदाचा तात्पुरता कार्यभार श्री. भागडे यांच्याकडे देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले.

आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे कोणाला द्यावीत याचे अधिकार कृषी खात्याच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांच्याकडे होते. त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. भागडे यांच्याकडे सूत्रे देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी भागडे यांच्या नावाचा आदेश सोमवारी (ता. ३) सायंकाळी जारी केला.

राज्य सरकारने डॉ. गेडाम यांची बदली करताना पूर्ण वेळ कृषी आयुक्त दिला नाही. गेडाम यांनी पद सोडताना कृषी सचिवांच्या सल्ल्याने आयुक्तपदाचा कार्यभार इतर अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे आदेशात स्पष्ट नमुद केले होते. परंतु, ‘इतर अधिकारी’ कोण हे गेडाम यांना सुचविण्यात आले नाही. परिणामी, त्यांनी एकतर्फी पदभार सोडत नाशिकच्या विभागीय आयुक्तपदाची सूत्रे तत्काळ स्वीकारली. परंतु, इकडे तीन दिवस राज्याला कृषी आयुक्त नव्हता.

स्मार्ट प्रकल्पाचे विद्यमान प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर यांच्याकडे कृषी आयुक्तपदाचा कार्यभार दिला जाईल, अशी चर्चा आयुक्तालयात होती. परंतु, ती अटकळही चुकली. श्री. भागडे हे शेतकरी कुटुंबातील असून मूळचे महसूल खात्याच्या सेवेतील आहेत. यापूर्वी तत्कालीन कृषी आयुक्त धीरज कुमार रजेवर असता आयुक्तपदाची सूत्रे राज्य शासनाने श्री. भागडे यांच्याकडे दिली होती. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शेती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रशासकीय कामात कठोर निर्णय न घेणारे शांत व संयमी सनदी अधिकारी म्हणून ते परिचित आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT