Gajanan Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Lemon Production : व्यवस्थापनातून चांगले लिंबू उत्पादन शक्य : तुपकर

Gajanan Tupkar : लिंबू पिकाचे चांगल्याप्रकारे उत्पादन होऊ शकते, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. गजानन तुपकर यांनी केले.

Team Agrowon

Akola News : हस्त बहरासाठी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, मशागत, खत व्यवस्थापन, ओलित व्यवस्थापन आणि संजिवकांचा वापर केल्यास लिंबू पिकाचे चांगल्याप्रकारे उत्पादन होऊ शकते, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. गजानन तुपकर यांनी केले.

बाळापूर तालुक्यातील मौजे चिंचोली गणू येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या मार्फत लिंबू हस्तबहार व्यवस्थापन विषयावर शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी डॉ. तुपकर बोलत होते.

डॉ. शुभांगी खंदारे, पोकरा प्रकल्पाचे गोपाल बोंडे, आत्मा यंत्रणेचे विजय शेगोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतीशाळेमधील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. तुपकर म्हणाले, की हस्त बहराचे नियोजन केल्यावर झाडावर हंगाम नसताना देखील फळांची संख्या अधिक राखली जाते.

यामुळे झाडांची होणारी झीज भरून काढणे, झाडांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी योग्य वेळी अन्नद्रव्यांच्या योग्य मात्रेचे नियोजन करावे. डॉ. खंदारे यांनी लिंबू वरील महत्त्वाच्या कीडी आणि रोगांच्या प्रभावी व्यवस्थापनाविषयी सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी शेतीशाळेमध्ये लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आत्माचे शेगोकार, कृषी सहायक उद्धव धुमाळे यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT