Beekeeping  Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping : ‘परागीभवनाद्वारे पीक उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिकापालन करा’

Dr Swati Gurve : शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिकापालन करा व निसर्गातील मधुमक्षिकांना घर देण्याचे समाजकार्य शेतकऱ्यांनी करावे, असे बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. स्वाती गुर्वे यांनी केले.

Team Agrowon

Satara News : आनंदपूरसारख्या डोंगरालगतच्या निसर्गाची उत्तम देणगी असणाऱ्या भाजीपाला उत्पादन करणाऱ्या गावात फक्त मधापुरता मधुमक्षिकापालन हा व्यवसाय न करता परागीभवनाद्वारे पिकाचे ५ ते ४० टक्के उत्पादनवाढीसाठी शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिकापालन करा व निसर्गातील मधुमक्षिकांना घर देण्याचे समाजकार्य शेतकऱ्यांनी करावे, असे बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. स्वाती गुर्वे यांनी केले.

आनंदपूर (ता. वाई) येथे कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, आत्मा व कृषी विभा यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रोक्त पद्धतीने मधुमक्षिकापालन प्रशिक्षण पार पडले

या वेळी डॉ. गुर्वे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे होते. डॉ. गुर्वे म्हणाल्या, की मधुमक्षिकेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून तिचे संगोपन व संवर्धन करणे आज निसर्गाची जैवविविधता राखण्यासाठी काळाची गरज आहे.

सरपंच संतोष साळुंखे, प्रेम साळुंखे, भाऊसाहेब शेलार, सुनील फरांदे, विनोद शेळके, विक्रम मोहिते, योगेश जायकर, हणमंत साळुंखे आदी उपस्थित होते. निखिल रायकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप देवरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद साळुंखे यांनी आभार मानले. बीटीएम आत्मा प्रदीप देवरे, प्रमोद साळुंखे यांनी नियोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT