Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या

Kharif Sowing : चांगला पाऊस होत असून, पेरणीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्याने पेरणीला सुरवात केली आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात चांगला पाऊस होत असून, पेरणीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्याने पेरणीला सुरवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ झाली आहे.

अशा स्थितीत जिल्ह्यात बियाणे तसेच खतांचा तुटवडा जाणवू नये तसेच चढ्या दराने कुणीही बियाण्याची विक्री करू नये. यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

जिल्ह्यात काही विभागात चढ्या दराने बियाणे विक्रीची तक्रारी प्राप्त झाल्या. एका वाणांचे दर हे सर्वत्र एकच असावेत व ज्या त्या कंपन्यांनी आपआपले दर प्रसिद्ध करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. यावर मंत्री भुसे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना केली. तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या पथकाने सक्रिय होत कुठे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.

फसवणूक होत असल्यास तक्रारी करा

नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाचे १६ भरारी पथके तयार केले असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तक्रार करावी. तसेच पालकमंत्री कार्यालयाच्या ९४२२८४१२११ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन भुसे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT