Ghodnadi River Agrowon
ॲग्रो विशेष

River Barrage Work : घोडनदीवरील बंधाऱ्याच्या कामाला साडेतीन वर्षांपासून ‘ब्रेक’

Ghodnadi River : साधारण चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून जवळे-निरगुडसर या गावाच्या दरम्यान घोडनदीवर असलेल्या बुडीत बंधाऱ्याच्या कामासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला

Team Agrowon

Pune News : जवळे-निरगुडसर (ता.आंबेगाव) या दोन गावांदरम्यान घोडनदीवर ३५ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या बुडीत बंधाऱ्याच्या कामाला गेल्या साडेतीन वर्षांपासून ब्रेक लागला आहे, तरी संबंधित विभागाने बुडीत बंधाऱ्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याची मागणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची संचालक बाबासाहेब खालकर व जवळे ग्रामस्थांनी केली आहे.

साधारण चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून जवळे-निरगुडसर या गावाच्या दरम्यान घोडनदीवर असलेल्या बुडीत बंधाऱ्याच्या कामासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन झाले.

कामालाही सुरुवात झाली परंतु काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिल्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून या बुडीत बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडलेले आहे.

जवळे, निरगुडसर शेतकरी यांच्या मागणीनुसार या बुडीत बंधाऱ्याच्या कामाला निधी उपलब्ध करून दिला आहे. बुडीत बंधाऱ्यामुळे निरगुडसर, जवळे परिसरांतील शेती पिकांना अडवलेल्या पाण्याचा फायदा होणार आहे तसेच निरगुडसर पाणीपुरवठा योजनेला देखील या बुडीत बंधाऱ्याचा मोठा लाभ होणार आहे.

या रखडलेल्या कामाबाबत जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या बंद कामाकडे सहकारमंत्री दिलीप पाटील यांनी लक्ष घालून ते तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT