Fishing Agrowon
ॲग्रो विशेष

Fishing Ban : पिलांच्या मासेमारीवर निर्बंध

Restriction of Fishing : पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भेडसावणारी मत्स्यसमस्या सुटण्याच्या दृष्टिकोनातून आणि अपरिपक्व पिल्लांच्या मासेमारीवर निर्बंध घातले आहेत.

Team Agrowon

Dahanu News : पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भेडसावणारी मत्स्यसमस्या सुटण्याच्या दृष्टिकोनातून आणि अपरिपक्व पिल्लांच्या मासेमारीवर निर्बंध घातले आहेत. अंडी असणारे आणि नुकतेच जन्मलेले मासे पकडल्यामुळे भविष्यातील मासेमारीवर मोठे संकट ओढावणार आहे. त्यासाठी मत्स्य संवर्धनाबरोबरच माशांचे प्रजोत्पादन मोठ्या प्रमाणावर होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ नोव्हेंबरला आदेश पारित केला आहे.

पारंपरिक मासेमारी करताना विशिष्ट प्रकारच्या माशांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या आकाराची छिद्रे असणारी जाळी वापरली जात होती. त्यामुळे त्यामध्ये माशांची पिल्ले न अडकता सहज निघून जात असत. मात्र, आता ट्रॉलर, पर्सेसीन, वाघरा, कव यांसारख्या आधुनिक यांत्रिकी पद्धतीने मासेमारी केल्यामुळे अत्यंत लहान माशांची कत्तल होऊ लागली आहे.

माशांच्या ऐन संवर्धनातील ३० दिवसांचा मासेमारी बंदीचा कालावधी कमी करून तो ६१ दिवसांवर आणला आहे. तरीही या कालावधीतही अत्यंत लहान माशांची मासेमारी करण्यात येते. त्यामुळे प्रजनन काळातील माशांच्या उत्पत्तीवर परिणाम झाला आहे.

परिणामी मत्स्य उत्पादनात सातत्याने घट झाली आहे. राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने शाश्‍वत मासेमारीसाठी माशांचे आकारमान निश्चित केले. लहान, अपरिपक्व मासे पकडण्याचे टाळून मत्स्य साठ्यांचे संवर्धन करण्याचे ठरवले आहे.

राज्य सरकारच्या आदेशाने समुद्रातील लहान, अपरिपक्व जीवांच्या मासेमारीवर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसा कायदाही करण्यात आला आहे. त्यामुळे लहान पिल्लांची मासेमारी करताना किंवा त्याची विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दिनेश पाटील, सहायक मत्स्यव्यवसाय विकास आयुक्त, पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT