Banana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Subsidy Scam: करमाळ्यात केळी भरपाई अनुदानात घोटाळा; बनावट पंचनाम्यांचा पर्दाफाश!

Fraudulent Subsidy: करमाळा तालुक्यात ज्या शेतकऱ्यांचे केळी बागेचे खरेच नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मात्र ज्यांनी कधी केळी लावली नाही. त्यांना मात्र केळीची नुकसान भरपाई मिळाली, तलाठ्यांनी खोटे बनावट पंचनामे करून ठरावीक लोकांना अनुदानाची रक्कम मिळवून दिली.

Team Agrowon

Solapur News: करमाळा तालुक्यात ज्या शेतकऱ्यांचे केळी बागेचे खरेच नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मात्र ज्यांनी कधी केळी लावली नाही. त्यांना मात्र केळीची नुकसान भरपाई मिळाली, तलाठ्यांनी खोटे बनावट पंचनामे करून ठरावीक लोकांना अनुदानाची रक्कम मिळवून दिली, या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी लोकशाही दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयाकडे केली.

तहसीलदार शिल्पाताई ठोकडे व सर्व खात्याचे खाते प्रमुख यांचे उपस्थितीत तहसील कार्यालयात लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या अडीअडचणी व तक्रारी समजावून घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. त्यात ही तक्रार आल्यानंतर तहसीलदार ठोकडे यांनी अनुदानासाठी फेर तपासणीचे आदेश दिले आहेत.

या बैठकीत केळी अनुदान व शहरातील अतिक्रमण यावर वादग्रस्त चर्चा झाली. मे २०२४ मध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागा जागेवर पडल्या होत्या. या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. याप्रमाणे तालुक्यातील ४७३३ शेतकऱ्यांना नऊ कोटी २७ लाख रुपयांचे अनुदान वितरित करणे चालू आहे.

मात्र प्रत्यक्ष अनुदान वाटताना ज्यांनी केळी लावली नाही, त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याचे निदर्शनाला आल्यामुळे उमरड (ता. करमाळा) येथे केळी उत्पादक शेतकरी व संबंधित एजंट यांच्यात मारामारी झाली, हा मुद्दाही चिवटे यांनी बैठकीत मांडला.

तहसीलदारांकडून कारवाईचे आदेश

या तक्रारीनंतर संबंधित तलाठी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना केळी अनुदान देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. मात्र अनुदान यादीत नाव आले आहे. त्यांना अनुदान देण्यात येणार नाही. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT