Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Seedling : केळी रोपांच्या दरातही वाढ

Banana Cultivation : बाजारपेठेतील स्पर्धा, अस्थिर शेतीमाल दर व नैसर्गिक समस्यांचा फटका अशा स्थितीत महाग केळी रोपांमुळे शेतकऱ्यांच्या खिशावरील ताण, खर्च वाढणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : बाजारपेठेतील स्पर्धा, अस्थिर शेतीमाल दर व नैसर्गिक समस्यांचा फटका अशा स्थितीत महाग केळी रोपांमुळे शेतकऱ्यांच्या खिशावरील ताण, खर्च वाढणार आहे. पपईनंतर आता केळी रोपांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. खानदेशात केळीची लागवड सतत वाढत आहे. पपई लागवडही वाढली आहे.

पपई दर मागील हंगामात कमी होते. यंदा दर स्थिर आहेत. अशात पपई लागवड यंदा नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत झाली आणि आता जानेवारी ते एप्रिल या कालावधीत सुरू आहे. परंतु पपई रोपांचे दर मागील हंगामात नऊ ते १३ रुपये प्रति रोप, असे होते. यंदा पपई रोपांचे दर ११ ते १७ रुपये प्रति रोप असे आहेत.

केळी रोपांची मागणी पाच ते सात वर्षांपूर्वी कमी होती. परंतु मागील चार वर्षांत केळीच्या उतिसंवर्धित रोपांची मागणी सतत वाढली आहे. यामुळे केळी रोपांचे दर सतत वाढले. काही वर्षींपूर्वी केळी रोपांचे दरही नऊ ते १३ रुपये प्रति रोप असे होते.

यानंतर ११ ते १५ रुपये प्रति रोप, असे दर झाले. पुन्हा दरवाढ झाली. त्यात दर १४ ते १७ रुपये प्रति रोप, असे विविध कंपन्यांनी निश्चित केले. आता १७ ते २० रुपये प्रति रोप, असे दर (पोचसह) आहेत.

पपई व केळी रोपांची दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. खानदेशात विविध भागातील केळी उतिसंवर्धित रोपे उत्पादन, निर्मात्या कंपन्या रोपांचा पुरवठा करतात.

तसेच काही स्थानिक कंपन्या अन्य जिल्ह्यांतही रोपांची पाठवणूक करतात. जशी रोपे व खतांची दरवाढ होत आहे, तशी केळी दरात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. केळीचा एकरी खर्च अलीकडे एक लाख ते एक लाख २० हजार रुपये एवढा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT