Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Plantation : उशिराच्या मृग बहर केळी लागवड सुरूच

Banana Farming : केळीची लागवड बारमाही सुरू असते. परंतु कमाल शेतकरी मृग व कांदेबाग बहरात केळी लागवड करतात. त्यात आगाप किंवा अर्ली व उशिराची लागवड असते.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मृग बहरातील उशिराची केळी लागवड सुरूच आहे. अर्ली केळी लागवड रावेर, यावल, मुक्ताईनगरात गेल्या महिन्यातच झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात वाढू शकते, अशी स्थिती आहे.

केळीची लागवड बारमाही सुरू असते. परंतु कमाल शेतकरी मृग व कांदेबाग बहरात केळी लागवड करतात. त्यात आगाप किंवा अर्ली व उशिराची लागवड असते. मृग बहरातील आगाप लागवड एप्रिल ते मे अखेरीस झाली.

नियमित लागवड जूनमध्ये झाली. तर सध्या किंवा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात उशिराची लागवड सुरू आहे. लागवडीसाठी उतिसंवर्धित केळी रोपांचा मोठा वापर खानदेशात सुरू आहे. रोपांचे दर वाढले आहेत. अनेक कंपन्या रोपे वेळेत देत नसल्यानेदेखील अडचणी येत आहेत.

केळीचे दर यंदा टिकून होते. या महिन्यात आणखी वधारले. केळीला चांगला पर्याय कृत्रिम जलसाठाधारकांकडे नाही. यामुळे केळी लागवड कायम आहे. यंदा ती वाढू शकते. यंदा मार्च ते मेच्या मध्यापर्यंत दर्जेदार केळीला चांगला उठाव होता. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले.

जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू झाली. तर कांदेबाग केळीची काढणी गणेशोत्सव, दसरा सणापासून सुरू होत असते. केळी लागवडीसाठी किंवा केळी रोपे लागवडीसाठी कुशल मजुरांची गरज असते.

या मजुरांची शोधाशोध शेतकरी करीत आहेत. त्यात दोन ते तीन दिवस लागत आहेत. तसेच मध्येच पाऊस येतो. तर ऊनही पडते. अशा स्थितीत केळी लागवड करून ती यशस्वी करण्यासंबंधी शेतकऱ्यांची धावपळ, लगबग दिसत आहे.

मृग बहर केळी अधिक

मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते. तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते.

तर मृग बहर केळीतची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते. . यंदा खानदेशात मृग बहरातील केळीची एकूण लागवड ५० ते ५५ हजार हेक्टरवर होऊ शकते. लागवड आणखी १० ते १५ दिवस सुरू राहील, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT