Banana Crop Loss Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Loss: वादळी वाऱ्याने केळीची बाग उद्ध्वस्त

Storm Hit Crop Damage: गाजीपूर येथील (ता. दारव्हा) येथील प्रयोगशील व राज्य शासनाचा उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी जगदीश चव्हाण यांच्या शेतातील केळीची बाग वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झाली.

Team Agrowon

Yavatmal News: गाजीपूर येथील (ता. दारव्हा) येथील प्रयोगशील व राज्य शासनाचा उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी जगदीश चव्हाण यांच्या शेतातील केळीची बाग वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झाली. यामुळे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यासोबतच काही भागांत वादळी वारे वाहत असल्याने भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान होत आहे. याचाच फटका गाजीपूर येथील जगदीश चव्हाण यांना देखील बसला. यामध्ये त्यांची अडीच एकर क्षेत्रातील केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

या घटनेत त्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे त्यांची ही बाग फळधारणेच्या अंतिम टप्प्यावर होती. लागवडीसाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला होता. त्यासोबतच शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर व्यवस्थापनात केला. या माध्यमातून गुणवत्तापूर्ण केळीचे उत्पादन घेण्यात त्यांचे सातत्य होते.

त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना राज्य शासनाने उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित केले आहे. दरम्यान, केळी बागेचे नुकसान झाल्यानंतर याचे सर्वेक्षण व पंचनामा व्हावा अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भाने त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच दारव्हा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT