Banana Crop Loss Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Loss: केळी नुकसानीचे पंचनामे अपूर्णच

Jalgaon Storm Damage: जिल्ह्यात ११ ते १५ जून या कालावधीत अनेक भागांत झालेल्या वादळी पावसामुळे केळीची हानी झाली आहे. परंतु नुकसानीची कमी टक्केवारी, अपूर्ण मनुष्यबळ व अन्य कारणांमुळे प्रशासनाकडून केळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News: जिल्ह्यात ११ ते १५ जून या कालावधीत अनेक भागांत झालेल्या वादळी पावसामुळे केळीची हानी झाली आहे. परंतु नुकसानीची कमी टक्केवारी, अपूर्ण मनुष्यबळ व अन्य कारणांमुळे प्रशासनाकडून केळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.

जिल्ह्यात ११ जून रोजी एरंडोल, जामनेर, जळगाव, चोपडा, धरणगाव या भागात केळीची वादळात हानी झाली. जळगाव तालुक्यातील म्हसावद, दापोरा, लमांजन, बोरनार, एरंडोलातील दापोरी, रवंजे, धरणगावातील चांदसर, कौठळ आदी भागातील केळीची हानी झाली.

जामनेरातील नेरी दिगर, चिंचखेडा, हिंगणे भागातील केळीसही मोठा फटका वादळात बसला. निसवलेल्या केळी बागा चिंचखेडा, नेरी भागात आडव्या झाल्या आहेत. मोठा खर्च यात शेतकऱ्यांनी केला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

यातील नेरी, चिंचखेडा व अन्य भागातील नुकसानीचे पंचनामे अजूनही झालेले नसल्याची माहिती आहे. नेरी येथे केळी पीक अधिक आहे. बागा निसवलेल्या होत्या. गणपती, नवरात्रीच्या कालावधीत बाजार हेरण्याच्या दृष्टीने अनेकांनी केळी लागवड केली होती. परंतु बागा निसवत असतानाच आडव्या झाल्याने हानी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवरील केळी बागांची हानी झाली आहे. यात मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव आदी भागांतील केळीला मोठा फटका बसला आहे.

नेरी येथे पंचनामे अखेर झाले

पाचोरा तालुक्यातील नेरी किंवा वडगाव नेरी येथे ११ जूनच्या वादळात केळीची मोठी हानी झाली. यात गावातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांची हानी झाली आहे. निसवलेल्या बागा आडव्या झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

पंचनामे सोमवारी (ता. १६) करण्यात आले. परंतु फळ पीकविमाधारक केळी उत्पाकांच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने पंचनामे व पुढील कार्यवाही केली जावी, अशी मागणी शेतकरी अण्णासाहेब निंबाळकर यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT