Agricultural Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Compensation: केळी नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी पावणेअकरा कोटींची मागणी

Banana Crop Loss: काही कालावधीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नांदेडमधील अर्धापूर, भोकर, कंधार, मुखेड, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांतील सात हजार ४९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Nanded News: काही कालावधीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नांदेडमधील अर्धापूर, भोकर, कंधार, मुखेड, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांतील सात हजार ४९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

यात चार हजार ७५९.७० हेक्टरवरील फळपिके तर ३१.५३ हेक्टर बागायती असे एकूण चार हजार ७९०.७८ हेक्टर क्षेत्रावरील पीक भुईसपाट झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला होता. याबाबत शासकीय यंत्रणेने पंचनामे करून प्रशासनाला सादर केले आहेत.

जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडे १० कोटी ७६ लाखांची मागणी केल्याची माहिती मिळाली.नांदेड जिल्ह्यात ९ जून रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले. विशेषत: अर्धापूर शिवारात केळी, पपई फळबाग असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा अहवाल शासनास त्वरित सादर केला जाईल. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी नुकतेच नुकसानग्रस्तांना भेटी दरम्यान सांगितले होते.

यानुसार प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीनिधीची मागणी केली आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नांदेडमधील अर्धापूर, भोकर, कंधार, मुखेड. देगलूर, हदगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांतील सात हजार ४९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

यात चार हजार ७५९.७० हेक्टरवरील फळपिके तर ३१.५३ हेक्टर बागायती असे चार हजार ७९०.७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. यातून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला. याबाबत शासकीय यंत्रणेने पंचनामे करून प्रशासनाला सादर केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT